

शक्तिपीठ महामार्ग आणि त्याला होणाऱ्या विरोधामुळे सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चांगलाच चर्चेत आला आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्दावरून शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. भक्ताची जमीन कोणत्याही देवाला चालत नाही, पण राज्यातल्या एका विशिष्ट देवाला मात्र चालते' असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता लगावला. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
जयंत पाटील हे वाळवा तालुक्यातील शेतकरी मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. दरम्यान शक्तिपीठ महामार्गामुळे वाळवा तालुक्यातील सुपीक बागायती जमिनींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे, यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. त्यांच्याकडे प्रकल्पाला विरोध होतोय. मागणी नसताना हा प्रकल्प शेतकऱ्यांवर लादला जात असल्याचा आरोप या मेळाव्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आम्हाला र्व देव पावले आहेत, पण एकच देव पावायचा राहिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जुना रस्ता पाहावा किंवा अन्य पर्याय शोधावा, पण हा विनाशकारी रस्ता रद्द करावा. मागणी नसताना हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या माथी मारला जातोय. वाळवा तालुका दरवर्षी कृष्णा आणि वारणेच्या महापुराचा सामना करतो, मात्र तो नैसर्गिक आहे.
पण शक्तिपीठ महामार्ग हे ‘मानवनिर्मित संकट’ ठरेन. शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त करून रस्ता बांधणे हे कोणत्याच देवाला मान्य नाहीये, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले. भक्ताची जमीन हिरावून घेणारा रस्ता कोणत्या देवाला हवा आहे? वाळव्याच्या शेतकऱ्याचा विरोध हा केवळ रस्त्याला नाहीये. तर आमच्या अस्तित्वावर येणाऱ्या गदेला आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एकजूट होऊन सामना करावा,असंही जयंत पाटील म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.