Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्ग जाणार तिथे रातोरात फुलवल्या आंब्याचा बागा, नेमकं कारण काय?

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गावरून वाद निर्माण झाला आहे. नुकसानभरपाई मिळवण्यासाठी बाधित जमिनीवर रातोरात आंब्याच्या बागांची लागवड करण्यात आली आहे.
Shaktipeeth Highway :
Mango plantations emerge overnight along Shaktipeeth Highway route, raising questions over compensation claims.saamtv
Published On
Summary
  • शक्तीपीठ महामार्गावरून नवीन वाद

  • बाधित जमिनीत रातोरात आंबा बागा

  • अधिक मोबदल्यासाठी घोटाळ्याचा आरोप

भारत नागणे, साम प्रतिनिधी

राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. मात्र ज्या मार्गातून हा महामार्ग जाणार आहे त्या जमिनीबाबत मोठा काळाबाजार होत असल्याचं समोर आले आहे. शक्तीपीठ महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या जमिनीमध्ये रातोरात आंब्याच्या बागा लावण्याचे काम सुरू झाले आहे

Shaktipeeth Highway :
पाणी जपूनच वापरा! उजनी, वैतरणा ते कोयना, जायकवाडी; राज्यातील कोणत्या धरणात किती पाणीसाठा? अधिकृत आकडेवारी समोर

शक्तीपीठ महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या जमिनीमध्ये रातोरात आंब्याच्या बागा लावण्याचे काम सुरू झाले आहे. शेतकऱ्यांच्या बाधित शेतीचे करार करून त्यामध्ये आंब्याची झाडे लावली जात आहेत‌. यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींच्या एजंटांमार्फत आंब्याची लागवड केली जात असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.

Shaktipeeth Highway :
Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग बदलला; २१ धार्मिक स्थळे, १३ जिल्हे, ४० तालुके अन् ४०० गावं जोडणारा महामार्ग कसा असणार?

सोलापूर जिल्ह्यातील शक्ती पीठ महामार्गाचे आरेखन बदलताच बाधित जमिनीत रातोरात आंब्याच्यासह इतर फळ झाडांची लागवड केली जात आहे. यातून सरकारची फसवणूक करून अधिक मोबदला घेण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, मोहोळ, सांगोला या भागातून जाणारा शक्तिपीठ महामार्गाला विरोध झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गाचे आरेखन बदलले आहे.

नव्याने माढा, पंढरपूर , माळशिरस मधून हा महामार्ग तयार केला आहे. या महामार्गात बाधित होणाऱ्या शेती गटांची माहिती समोर येताच माढा, पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील बाधित जमिनी मध्ये रातोरात आंब्याच्या बागा तयार होत आहेत. यासाठी पर राज्यातून दहा फूट उंची पर्यंतची आंब्याची झाडे मागवली आहेत. बाधित शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की,स्थानिक आमदारांनी त्यांचे एजंट नेमले आहेत. ते एजंट शेतकऱ्यांना संपर्क साधत आहेत. त्यांना आंब्याची झाडे लावून अधिकचा मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवत आहेत.

यासाठी शेतकरी आणि एजंट यांच्यात आंब्याची झाडे लावण्यासाठी करार पत्र केले आहे. या मध्ये बाधित आंबा बागेच्या 25 ते 30 टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर 70 ते 75 टक्के रक्कम करार करणाऱ्या एजंट लोकांना मिळणार आहे. अधिकचा आर्थिक मोबदला मिळण्यासाठी शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा फायदा घेतला जात आहे. एकीकडे बाधित शेतकऱ्यांना धीर देण्याची वेळ असताना काही एजंट सक्रिय होऊन शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन आपले उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com