Shocking : मटण अर्धवट शिजलं, मित्रांसमोरच नवऱ्यानं वाद घातला; अपमान सहन न झाल्यानं बायकोनं संपवली जीवनयात्रा

yavatmal woman suicide husband dispute mutton incident arni : मटण शिजलं नाही म्हणून नवऱ्यानं वाद घातल्यानंतर बायकोनं आत्महत्या केल्याची घटना यवतमाळच्या आर्णी तालुक्यात घडली. या प्रकरणी मृताच्या नवऱ्याला अटक करण्यात आली आहे.
नवऱ्यानं मित्रांसमोरच अपमान केल्याचा राग मनात धरून विवाहितेने आत्महत्या केली. यवतमाळमध्ये ही घटना घडली.
नवऱ्यानं मित्रांसमोरच अपमान केल्याचा राग मनात धरून विवाहितेने आत्महत्या केली. यवतमाळमध्ये ही घटना घडली. Saam tv
Published On

संजय राठोड, यवतमाळ | साम टीव्ही

मटण शिजले नाही या क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर पत्नीनं टोकाचं पाऊल उचललं. पाहुणचारासाठी बोलावलेल्या मित्रांसमोरच पतीनं अपमान केल्याचा राग मनात धरून तिनं विष पिऊन आत्महत्या केली. (maharashtra tragedy woman ends life after family dispute) यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे ही घटना घडली. चेतना मनोज जाधव (वय ३३) असे मृत महिलेचे नाव आहे.

चेतनाचा पती मनोज जाधव यानं चार मित्रांना घरी जेवणासाठी बोलावले होते. मटणाची भाजी चविष्ट करशील, असं त्यानं चेतनाला सांगितलं होतं. घरासमोरील अंगणात जेवणाचा बेत रंगला होता, पण पाहुण्यांसमोरच मनोजचा पारा चढला. मटण व्यवस्थित शिजले नसल्याच्या कारणावरून त्याने पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद केवळ स्वयंपाकापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्यात मनोजच्या जुन्या संशयी स्वभावाचा आणि व्यसनाचा तडका लागला.

मनोज हा दारूच्या आहारी गेला होता. २०१५ मध्येही त्याच्यावर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाला होता. २०१७ मध्ये पुन्हा सुखाने संसार करण्याच्या अटीवर चेतनाने त्याला माफ केले होते. पण बुधवारी पुन्हा दोघांमध्ये वाद उफाळून आला. मित्रांसमोरच झालेला अपमान तिला सहन झाला नाही. त्यामुळं तिनं टोकाचं पाऊल उचललं.

भरल्या ताटावरून उठून ती घरामध्ये गेली. ती विषारी द्रव्य प्यायली. त्यानंतर बाहेर येऊन पती मनोजला सांगितलं. त्यावेळी त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. तातडीने तिला आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथं डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

नवऱ्यानं मित्रांसमोरच अपमान केल्याचा राग मनात धरून विवाहितेने आत्महत्या केली. यवतमाळमध्ये ही घटना घडली.
Kalyan Crime: कल्याण हादरले! पोलिस ठाण्याबाहेरच रक्तरंजित थरार, महिला अन् तिच्या भावावर चाकू अन् दगडाने हल्ला

दोन मुलं पोरकी

चेतना आणि मनोज यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आता ही दोन्ही मुलं पोरकी झाली आहेत. चेतनाचे मामा मनोहर राठोड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मनोज जाधव याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. चेतनाच्या मृत्यूनंतर आर्णी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी केलेली गर्दी आणि त्यांचा आक्रोश काळजाला पिळवटून टाकणारा होता. पोलीस उपनिरीक्षक पल्लवी निनगूरकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नवऱ्यानं मित्रांसमोरच अपमान केल्याचा राग मनात धरून विवाहितेने आत्महत्या केली. यवतमाळमध्ये ही घटना घडली.
Shocking crime news: कुऱ्हाडीने पत्नीवर हल्ला, कापलेला पाय घेऊन पती पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, नेमकं घडलं काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com