Pune Crime: भररस्त्यात भाजप कार्यकर्त्याची हत्या, ९ गोळ्या झाडत जागीच संपवलं; पुणे हादरले

BJP worker shot dead in Maval: पुण्यातील मावळमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ९ गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात भाजप कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पुणे हादरले.
Pune Crime: भररस्त्यात भाजप कार्यकर्त्याची हत्या, ९ गोळ्या झाडत जागीच संपवलं; पुणे हादरले
Pune CrimeSaam Tv
Published On

Summary -

  • पुण्यात भाजप कार्यकर्त्याची हत्या

  • मावळच्या देहूरोड परिसरातील घटना

  • ९ गोळ्या झाडून भाजप कार्यकर्त्याची हत्या

  • घटनेमुळे मावळमध्ये तणावाचे वातावरण

दिलीप कांबळे, मावळ

पुण्याच्या मावळमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. भररस्त्यात भाजप कार्यकर्त्यावर गोळ्या झाडून जागीच संपवण्यात आले. ही घटना मावळच्या देवरोडवर घडली. गोळीबारात गंभीर जखमी झालेले भाजप कार्यकर्ते रमेश रेड्डी यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. सध्या मावळ पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मावळच्या देहूरोडमध्ये भाजप कार्यकर्ते रमेश रेड्डी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांना रमेश रेड्डी यांच्यावर ९ गोळ्या झाडल्या. त्यांच्या डोक्यात गोळी घुसल्यामुळे ते जागीच कोसळले. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ देहूरोड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

या घटनेमुळे देहूरोड परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. तर रमेश रेड्डी यांचे नातेवाईक आणि मित्र परिवाराने रुग्णालयाबाहेर आक्रोश करत जुना पुणे- मुंबई महामार्ग जाम करण्याचा प्रयत्न केला. पण देहूरोड पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रमेश रेड्डी यांचा मृतदेह पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलविण्यात आला. त्यांच्या हत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

दरम्यान, रमेश रेड्डीवर यांची हत्या करण्यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. देहूरोड पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. गोळीबाराच्या घटनेमुळे देहूरोड बाजारातील दुकाने व्यापारी वर्गाने त्वरित बंद केली. या घटनेनंतर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फूटेज तपासत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com