पुण्यातील इमारतीत चालायचा भलताच प्रकार; पोलिसांनी मध्यरात्री टाकला छापा, १५ बांगलादेशींसह महिला अन् पुरुष ताब्यात

pune budhwar peth shocking : पुण्यातील इमारतीत भलताच प्रकार सुरू होता. पोलिसांनी कारवाईदरम्यान १५ बांगलादेशींसह महिला आणि पुरुष ताब्यात घेतले.
pune crime news
pune news Saam tv
Published On

पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्याव्यवसायावर मध्यरात्री छापा

इमारतीतील १५ बांगलादेशींसह १८ महिला- पुरुष ताब्यात

पोलिसांच्या एका पथकाकडून धडक कारवाई

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुण्यातील बुधवार पेठ परिसरातील ‘डिस्को’ आणि ‘माचिस’ इमारतीत पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला. पोलिसांंना दोन्ही इमारतीत वेश्याव्यवसाय चालत असल्याचे आढळले. पोलिसांनी या इमारतीत पहाटे पाच वाजेपर्यंत कारवाई केली. या कारवाईत १५ बांगलादेशींसह महिला आणि पुरुषांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी महिलांमध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे.

pune crime news
Pune : पुण्यात रेस्क्यू केलेल्या १३ बांगलादेशी मुली पळाल्या, केअरटेकर अन् सुरक्षारकावर हल्ला केला नंतर...; VIDEO समोर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘डिस्को बिल्डिंग’ आणि ‘माचिस बिल्डिंग’च्या विविध मजल्यांवर धाड टाकली. पोलिसांना कारवाईदरम्यान १५ ते ३० वयोगटातील ११ महिला वेश्याव्यवसाय करत असल्याचे समोर आले. हा वैश्याव्यवसाय ‘माचिस बिल्डिंग’मधील चौथ्या मजल्यावरून कार्यरत असल्याची माहिती तपासात समोर आलाय.

वैश्याव्यवसाय हा ज्योती उर्फ सबीना अस्लम शेख (वय ४०) ही त्यांची 'अक्का' म्हणून काम पाहायची. तर समीर मुस्तफा हलवदार (वय २९) आणि राहुल शर्मा (वय २४) हे व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. 33 वर्षीय सुमित मिलिंद चव्हाण हा या दोन्ही इमारतींमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

pune crime news
Mumbai : 'मला हिंदू मुली आवडतात...' अश्लील व्हिडिओ पाठवले, शारीरिक संबंधांची मागणी; नाशिकनंतर मुंबईत कॉर्पोरेट जिहाद

पोलिसांना १५ बांगलादेशी नागरिक आढळले. त्यात ११ महिला, तीन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश असल्याचे समोर आलं. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलांमध्ये एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. या अल्पवयीन मुलीला बळजबरीने वैश्याव्यवसायात ढकलण्यात आल्याचे समोर आलंय. आरोपींच्या मोबाईल आणि हिशोबाच्या डायऱ्या जप्त करण्यात आल्यात. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com