Mumbai : 'मला हिंदू मुली आवडतात...' अश्लील व्हिडिओ पाठवले, शारीरिक संबंधांची मागणी; नाशिकनंतर मुंबईत कॉर्पोरेट जिहाद

Mumbai Crime News : मुंबईतील एका कॉर्पोरेट कंपनीत काम करणाऱ्या तरुणीला सहकाऱ्याने अश्लील संदेश पाठवून छळ केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Mumbai : 'मला हिंदू मुली आवडतात...' अश्लील व्हिडिओ पाठवले, शारीरिक संबंधांची मागणी; नाशिकनंतर मुंबईत कॉर्पोरेट जिहाद
Mumbai Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • नाशिकनंतर मुंबईत कॉर्पोरेट जिहाद प्रकरण

  • तरुणीला अश्लील संदेश पाठवणाऱ्या आरोपीला अटक

  • पोलिसांकडून गुन्हा नोंद; तपास सुरू

  • महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा चिंता व्यक्त

महाराष्ट्रातील नाशिक येथील बहुराष्ट्रीत कंपनी TCS मधील लैंगिक शोषण आणि धर्मांतराचं प्रकरण ताजे असताना मुंबईतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत टेलिकॉलर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीला तिच्या एका सहकाऱ्याने अश्लील संदेश पाठवल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून अग्रिपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव अश्रफ सिद्दिकी असे असून तो समाजवादी पक्षाच्या नगरसेविका इरम सिद्दीकी यांचा भाचा असल्याची माहिती आहे. पीडित तरुणी आणि आरोपी हे दोघेही मुंबईतील एका खासगी कंपनीत टेलिकॉलर म्हणून काम करत होते. २१ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत आरोपीने नोकरीसाठी मुलाखतीला आलेल्या मुलींचे मोबाईल क्रमांक मिळवले आणि त्याचा गैरवापर करत त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली.

Mumbai : 'मला हिंदू मुली आवडतात...' अश्लील व्हिडिओ पाठवले, शारीरिक संबंधांची मागणी; नाशिकनंतर मुंबईत कॉर्पोरेट जिहाद
Kalyan Dombivli : कल्याण- डोंबिवलीत पाणीबाणी, १२ तास पाणीपुरवठा राहणार बंद; कोणकोणत्या भागांना फटका बसणार?

आरोपी अश्रफने पीडित तरुणीला सतत फोन कॉल्स करून तसेच व्हॉट्सअॅपवर अश्लील शारीरिक संबंधांच्या मागणीचे मेसेज , फोटो आणि व्हिडिओ पाठवले. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने मेसेजमध्ये “मला हिंदू मुलीच आवडतात” असे म्हणत तरुणीचा मानसिक छळ केला. एवढ्यावरच न थांबता त्याने तिचा पाठलाग केल्याची माहितीही समोर आली आहे. तपासादरम्यान, आरोपीने आणखी ३ ते ४ मुलींनाही अशाच प्रकारे लक्ष्य केल्याचे उघड झाले आहे.

Mumbai : 'मला हिंदू मुली आवडतात...' अश्लील व्हिडिओ पाठवले, शारीरिक संबंधांची मागणी; नाशिकनंतर मुंबईत कॉर्पोरेट जिहाद
Mumbai : 'तुझे ते फोटो व्हायरल करेन', महिला क्रिकेटपटूला मुंबई पोलिसांकडून अटक, प्रसिद्ध व्यवसायिकाला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं

पीडित तरुणीने धैर्य दाखवत आग्रीपाडा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीला अटक केली. आरोपीवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५४ आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणावर किशोरी पेडणेकर यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत, अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली. त्यांनी मुलींना न घाबरता पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन केले असून, समाजानेही अशा गुन्ह्यांविरोधात ठाम भूमिका घ्यावी असे सांगितले. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, आरोपीने आणखी किती मुलींना लक्ष्य केले आहे याचा शोध घेतला जात आहे. मुंबईत वाढत्या अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com