Kalyan Dombivli : कल्याण- डोंबिवलीत पाणीबाणी, १२ तास पाणीपुरवठा राहणार बंद; कोणकोणत्या भागांना फटका बसणार?

Kalyan Dombivli Water Supply Cut : केडीएमसीने २८ एप्रिल रोजी देखभाल कामांसाठी १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण-डोंबिवलीसह अनेक भागांवर याचा परिणाम होणार असून नागरिकांनी पाणी साठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Kalyan Dombivli : कल्याण- डोंबिवलीत पाणीबाणी, १२ तास पाणीपुरवठा राहणार बंद; कोणकोणत्या भागांना फटका बसणार?
Kalyan Dombivli Water Supply CutSaam tv
Published On
Summary
  • २८ एप्रिल रोजी १२ तास पाणीपुरवठा बंद

  • केडीएमसीकडून देखभाल कामासाठी निर्णय

  • कल्याण-डोंबिवलीसह अनेक भाग प्रभावित

  • नागरिकांना पाणी साठवण्याचे आणि बचतीचे आवाहन

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण डोंबिवलीकरांनो पाण्याचा अपव्यय करत असाल तर थांबा आधी ही बातमी वाचा. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) प्रशासनाने शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी २८ एप्रिल रोजी १२ तास पाणीपुरवठा बंद Water Shortage ठेवण्याची घोषणा केली आहे. यामुळे पुरेसा पाणी साठा करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांवरील विद्युत व यांत्रिक उपकरणांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामांसाठी मंगळवार, २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या बंदचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवणार असून, कल्याण शहरातील पूर्व आणि पश्चिम भाग, डोंबिवली पूर्व-पश्चिम तसेच कल्याण ग्रामीण भागातील मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि इतर गावांमध्ये पाणीपुरवठा खंडित Water Crisis राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढे पाणी आधीच साठवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Kalyan Dombivli : कल्याण- डोंबिवलीत पाणीबाणी, १२ तास पाणीपुरवठा राहणार बंद; कोणकोणत्या भागांना फटका बसणार?
Shocking : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर अपहरण करून डांबून ठेवलं; लग्न करण्यासाठी तरुणाचं संतापजनक कृत्य

महापालिकेने नागरिकांना पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करण्याचेही आवाहन केले आहे. विशेषतः या कालावधीत अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा, तसेच उपलब्ध पाण्याचा योग्य नियोजन करून वापर करावा, असेही सांगण्यात आले आहे. केडीएमसी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही देखभाल कामे पाणीपुरवठा व्यवस्थेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी आवश्यक आहेत.

Kalyan Dombivli : कल्याण- डोंबिवलीत पाणीबाणी, १२ तास पाणीपुरवठा राहणार बंद; कोणकोणत्या भागांना फटका बसणार?
Mumbai : 'तुझे ते फोटो व्हायरल करेन', महिला क्रिकेटपटूला मुंबई पोलिसांकडून अटक, प्रसिद्ध व्यवसायिकाला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं

दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभाग सतत प्रयत्नशील राहणार असून, शक्य तितक्या लवकर पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जाईल. दरम्यान, नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेत प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि भविष्यातील अडथळे टाळण्यासाठी ही कामे महत्त्वाची असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com