Crime news: रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा विवस्त्र मृतदेह आढळला; फ्लॅटचे दार तोडून पोलीस आत घुसताच उडाली खळबळ

Bengaluru woman found dead: बंगळूरूमधील भाड्याच्या फ्लॅटमध्ये ३४ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसून पोलिसांचा तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येणार आहे.
Crime News
Crime NewsSaam tv
Published On

बंगळूरूमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये ३४ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण रक्तबंबाळ झालेला मृतदेह नग्न अवस्थेत होता. त्याप्रमाणे, या महिलेची हत्या काही दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

या मृत महिलेचे नाव पूजा दत्ता असे होते. पूजा ही झारखंडच्या धनबाद परिसरात राहणारी होती. तिने नुकतीच एका कंपनीतील नोकरी सोडली होती आणि ती सध्या बेरोजगार होती. मिळालेल्या माहितीनुसार, ती गेल्या ३ वर्षांपासून बंगळूरूच्या या भाड्याच्या घरात राहत होती.

Crime News
Shocking : बाप की हैवान! पोटच्या ६ वर्षाच्या मुलाची हत्या करून नदीत फेकलं; धक्कादायक कारण समोर

नग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडला

हा मृतदेह काही दिवसांपासून या फ्लॅटमध्ये पडून होता. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्यातून दुर्गंध येऊ लागला. त्यावेळी त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांना समोर या महिलेचा मृतदेह नग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचा मृतदेह पूर्णपणे कुजला होता. त्या मृतदेहाची स्थिती पाहून महिलेचा मृत्यू जवळपास दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज आहे.

Crime News
Man Died: लग्नाआधी होणाऱ्या बायकोला फ्लॅटवर बोलावलं; शक्तीवर्धक गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळं तरुणाचा मृत्यू

नुकतीच सोडली होती नोकरी

पोलिसांनी तिच्या घराची तपासणी केली असता, त्यांना एक पत्र सापडले. हे पत्र एका कंपनीचे असल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार, हे आत्महत्या असल्याचे म्हटले जात आहे.

Crime News
Crime news: धक्कादायक! 'जेवणात चिकन का नाही', पती जोरजोरात ओरडला; वैतागलेल्या पत्नीने विळ्याने चिरला गळा

या महिलेला अखेरचे २३ एप्रिल रोजी किराणा मालाच्या दुकानात पाहिले होते. पोलिसांनी मृत्यूची नोंद करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर ही हत्या आहे की आत्महत्या, हे स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com