Crime: तरुणाकडून वृद्ध आईवर बलात्कार, आधी बेदम मारहाण, नंतर हात-पाय बांधून रात्रभर अत्याचार

Delhi Crime: दिल्लीमध्ये एका तरुणाने दारूच्या नशेत आपल्या वयोवृद्ध आईवर बलात्कार केला. आईला आधी मारहाण केली त्यानंतर तिचे हात-पाय बांधून ठेवत रात्रभर आरोपीने तिच्यावर अत्याचार केले.
Crime: तरुणाकडून वृद्ध आईवर बलात्कार, आधी बेदम मारहाण, नंतर हात-पाय बांधून रात्रभर अत्याचार
Delhi CrimeSaam Tv
Published On

Summary -

  • दारूच्या नशेत मुलाकडून आईवर बलात्कार

  • दिल्लीच्या बुराडीमध्ये धक्कादायक घटना घडली

  • मारहाण करून आणि हात-पाय बांधून रात्रभर केला अत्याचार

  • पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला

राजधानी दिल्लीमध्ये हादरवून टाकणारी घटना घडली. मुलाने दारूच्या नशेत आपल्या वृद्ध आईवर बलात्कार केला. उत्तर दिल्लीतील बुराडी परिसरात ही संतापजनक घटना घडली. दारूच्या नशेत असलेल्या एका ३६ वर्षीय तरुणाने आपल्या ७० वर्षीय आईला बांधून ठेवत रात्रभर तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिलेने स्वत:ची सुटका करून घेतली आणि सकाळी आपल्या मुलीला या भयंकर घटनेविषयी सांगितले तेव्हा ही घटना समोर आली.

पीडित महिला आणि तिच्या मुलीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी महिलेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर बलात्कार आणि मारहाण झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा दिल्ली पोलिस कसून तपास करत आहेत.

Crime: तरुणाकडून वृद्ध आईवर बलात्कार, आधी बेदम मारहाण, नंतर हात-पाय बांधून रात्रभर अत्याचार
Crime: पुण्याला 'भाभी'च्या घरी जाते सांगून घराबाहेर पडली, नंतर लॉजमध्ये आढळला निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह; नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७० वर्षीय पीडित महिला बुराडी परिसरात आपल्या मुलासोबत आणि १६ वर्षांच्या नातीसोबत राहते. ही महिला घरकाम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. या महिलेच्या मुलाला दारूचे व्यसन लागले होते. शुक्रवारी त्याने आपल्या मुलीला मारहाण केली. त्यामुळे त्याची मुलगी रागावून जवळ राहत असलेल्या आपल्या मावशीच्या घरी गेली. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी रात्री आरोपी दारूच्या नशेत घरी आला. त्याने आईकडे जेवण मागितले. तेव्हा तो दारूच्या नशेत असल्याने आईला शिवीगाळ करू लागला.

Crime: तरुणाकडून वृद्ध आईवर बलात्कार, आधी बेदम मारहाण, नंतर हात-पाय बांधून रात्रभर अत्याचार
Crime: १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, घरी जाताना अपहरण करत फ्लॅटवर नेलं अन्...; पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

रागाच्या भरात आरोपीने आईला मारहाण केली आणि तिचे हातपाय बांधले. त्यानंतर रात्रभर त्याने आपल्या वृद्ध आईवर बलात्कार केला. दारूच्या नशेत असलेला आरोपी झोपून गेला. आईने पहाटे ४ वाजताच्या सुमारास कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि आपल्या मुलीला घटनेची माहिती दिली. त्यानंतर रविवारी पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. पोलिसांनी वृद्ध महिला आणि आरोपीच्या मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. त्यानंतर आरोपीच्या आईच्या जबाबाच्या आधारे त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. या संतापजनक घटनेमुळे दिल्ली हादरली आहे.

Crime: तरुणाकडून वृद्ध आईवर बलात्कार, आधी बेदम मारहाण, नंतर हात-पाय बांधून रात्रभर अत्याचार
Crime News: सूनेने सासऱ्याचा प्रायव्हेट पार्ट ठेचला; गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू, कशावरून इतका टोकाचा वाद झाला?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com