Jalgaon Crime: नाशिकनंतर जळगावमध्ये भोंदू कांड, करणी झाल्याचे महिलेला सांगून अघोरी पूजा, पोलिस पत्नीनेही दिली साथ

Jalgaon Bhondubaba Kand: नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर जळगावमध्ये देखील असेच प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी एका भोंदूबाबाने आपल्या पोलिस पत्नीच्या मदतीने अघोरी पूजा करत एका महिलेला फसवलं.
Jalgaon Crime: नाशिकनंतर जळगावमध्ये भोंदू कांड, करणी झाल्याचे महिलेला सांगून अघोरी पूजा, पोलिस पत्नीनेही दिली साथ
Jalgaon Bhondubaba KandSaam Tv
Published On

Summary -

  • जळगावमध्ये भोंदूबाबा कांड उघडकीस

  • करणी आणि अघोरी पूजेच्या नावाखाली महिलेची १२ लाखंची फसवणूक केली

  • आरोपी भोंदूला पोलिस पत्नीने दिली साथ

  • पीडित महिलेची पोलिसांकडे न्यायासाठी धाव

संजय महाजन, जळगाव

जळगाव शहरात अघोरी विद्या, करणी बाधा आणि गुप्त धन देण्याच्या नावाखाली एका महिला ग्राफिक डिझायनची तब्बल ११ ते १२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भोंदूबाबा ललित पाटील आणि त्याची महिला पोलिस कर्मचारी पत्नी महिमा उर्फ मनोरमा पाटील यांच्याविरुद्ध २०२२ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र साडेतीन ते चार वर्षांचा कालावधी उलटूनही दोन्ही आरोपी अद्याप फरारच आहेत. पीडित फिर्यादी महिलेने नुकतीच जळगाव पोलिस अधीक्षकांची भेट घेत आरोपींना शोधून तिचे पैसे परत मिळवून देण्याची विनंती केली आहे.

पीडित महिला आणि आरोपी महिमा पाटील या कॉलेजपासून एकमेकींच्या परिचयातील होत्या. घरगुती वादाच्या पार्श्वभूमीवर पीडित महिलेने मैत्रिणीशी संपर्क साधला असता महिमाने आपल्या पतीकडे अलौकिक शक्ती असल्याचे सांगून त्यांच्याकडे उपाय असल्याचे पटवून दिले. त्यानंतर ललित पाटीलने ‘अंगात पीर बाबा येतात’ असे भासवत अघोरी विधी सुरू केले. दिराने आत्महत्या केली असून त्याच्या आत्म्याने तुझ्या घरात प्रवेश केला आहे. म्हणून तुमच्या घरात वाद होत आहेत. तुझ्या दिराचा आत्मा तुला त्रास देतोय. म्हणून तुझ्यावर असे प्रसंग पुन्हा पुन्हा ओढवतच राहणार. तुझ्या घरावर करणी केली गेली आहे. ती बाधा काढून घेण्यासाठी तुला पूजा करावीच लागेल अशा पद्धतीने आरोपींनी पीडित महिलेला तिच्या कुटुंबावर करणी झाल्याची भीती दाखवून आपल्या घरी पूजा करून सुरुवातीला लहान रक्कम घेतली.

Jalgaon Crime: नाशिकनंतर जळगावमध्ये भोंदू कांड, करणी झाल्याचे महिलेला सांगून अघोरी पूजा, पोलिस पत्नीनेही दिली साथ
Kharat Case : त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही...भोंदू अशोक खरातवरून विधानसभेत खडाजंगी, कोण काय म्हणालं? VIDEO

त्यानंतर ‘गुप्त धन’ मिळवून देण्याचे आमिष दाखवत वेळोवेळी लाखो रुपये उकळले. ही रक्कम रोख तसेच ऑनलाईन व्यवहारांद्वारे घेतली गेली. फसवणुकीचा भाग म्हणून आरोपींनी पीडित महिलेसह इतर कुटुंबांना देशभर फिरवले. उज्जैन येथील स्मशानभूमीत अघोरी पूजा, गोगामेडी, पुष्कर, अजमेर, ओंकारेश्वर येथे विविध विधी करण्यात आले. तसेच भारत-पाकिस्तान सीमेवरील तनोट माता मंदिर येथे विशेष पूजा केल्याचे सांगून मोठी रक्कम उकळण्यात आली. जळगावात परतल्यानंतरही आरोपी दांपत्याने पीडित महिलेच्या घरी मुक्काम करून घरातील बाधा काढण्याच्या नावाखाली पुन्हा पुन्हा पैशांची मागणी केली. बाहेरून कर्ज काढून सातत्याने पैसे देऊनही काहीच फरक न पडल्याने पीडित महिलेने पैसे परत मागितले असता आरोपी ललित पाटील याने “मी अघोरी आहे, पैसे मागितल्यास तुमच्या सात पिढ्यांचा नाश करेन” अशी गंभीर धमकी दिली.

Jalgaon Crime: नाशिकनंतर जळगावमध्ये भोंदू कांड, करणी झाल्याचे महिलेला सांगून अघोरी पूजा, पोलिस पत्नीनेही दिली साथ
Ashok Kharat Update : अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांच्या बहिणीची चौकशी, VIDEO

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगाव रामानंद पोलिसांनी आरोपी महिमा पाटील ही भांडूप येथे कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे धाव घेतली होती. मात्र, तेथेही ती आढळून आली नाही. पोलिसांचे पथक सातत्याने आरोपींचा शोध घेत असले तरी अद्याप त्यांना अटक करण्यात यश आलेले नाही. गुन्हा दाखल होऊन साडेतीन वर्षे उलटूनही आरोपी सापडले नसल्याने पीडित महिलेने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन आरोपींचा शोध लावून आपली फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. तसेच आरोपी महिला पोलिस कर्मचारी असल्यामुळे तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोपही पीडित महिलेने केला आहे.

Jalgaon Crime: नाशिकनंतर जळगावमध्ये भोंदू कांड, करणी झाल्याचे महिलेला सांगून अघोरी पूजा, पोलिस पत्नीनेही दिली साथ
Ashok Kharat: अशोक खरातच्या घरात ई़डी, आलिशान कारसह मालमत्ताही होणार जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com