Kharat Case : त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही...भोंदू अशोक खरातवरून विधानसभेत खडाजंगी, कोण काय म्हणालं? VIDEO

Maharashtra Politics : नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. आमदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्याने वातावरण तापले असून सीडीआर तपासाची मागणीही जोर धरत आहे. संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती वाचा.

Ashok Kharat controversy in Maharashtra assembly debate : नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण ढवळून निघाले आहे. अशोक खरात प्रकऱणाचे पडसाद विधानसभा अधिवेशनात पडले. खरात प्रकरणावरून विधानसभेतील वातावरण चांगलेच तापले होते. खरात प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधारी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आज सभागृहात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.

आमदार भास्कर जाधव यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले. आम्ही स्वतःला पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं. अंधश्रद्धा निर्मूलन कायदे करायचे. दुसरीकडे अशा भोंदू बाबांच्या नादी लागतो? त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता, तुम्हाला लाजा वाटत नाही का? अशा शब्दात भास्कर जाधव यांनी विधानसभेत आपला संताप व्यक्त केला.

या भोंदू बाबाच्या संपर्कात केवळ सामान्य जनताच नाही, तर काही मोठे राजकीय नेते, आयएएस (IAS) आणि आयपीएस (IPS) अधिकारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी संबंधित नेत्यांचे आणि अधिकाऱ्यांचे मोबाईल सीडीआर (Call Detail Records) तपासले पाहिजेत अशी मागणीही त्यांनी केली.

या प्रकरणात अनेक महिलांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला काही महिला समोर यायला तयार नव्हत्या, मात्र आता धीर मिळाल्यानंतर काही महिलांनी तक्रारी दिल्या आहेत आणि आणखी तक्रारी येण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com