Public Holiday: महत्त्वाची बातमी! २३ एप्रिलला सार्वजनिक सुट्टी; या ठिकाणी शाळा, कॉलेज अन् सरकारी कार्यालये राहणार बंद; कारण काय?

Public Holiday Announced on 23rd April 2026: राज्यात बारामती आणि राहुरी मतदारसंघाची पोटनिवडणुक होणार आहे. या दोन्ही मतदारसंघात २३ एप्रिलला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
Public Holiday
Public HolidaySaam Tv
Published On
Summary

२३ एप्रिलला या ठिकाणी सार्वजनिक सुट्टी

पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सुट्टी

राज्यात पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत.२३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २०१- बारामती आणि २२३- राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका होणार आहे. यामुळे या मतदारसंघात शासकीय सुट्टी असणार आहे.

Public Holiday
April Bank Holiday: पुढच्या आठवड्यात बॅंकांना किती सुट्ट्या असणार? RBI ने दिली यादी; वाचा

२३ एप्रिलला सार्वजनिक सुट्टी जाहीर

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ पोटनिवडणुकीसाठी रोजी मतदान होणार आहे. या मतदार संघातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी बारामती व राहुरी विधानसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जाहीर केली आहे. ज्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत, त्या ठिकाणी सुट्टी असणार आहे. यामुळे शाळा-कॉलेजलाही सुट्टी असणार आहे. तरुणांनी मतदान करावे, यासाठी ही सुट्टी असणार आहे.

Public Holiday
Bank Holiday: राज्यात बँकांना सलग ६ दिवस सुट्ट्या; महाराष्ट्रात काय स्थिती? वाचा सुट्ट्यांची यादी

या ठिकाणी सार्वजनिक सुट्टी (Government Holiday on 23rd April 2026)

ही सार्वजनिक सुट्टी २०१- बारामती विधानसभा मतदारसंघ आणि २२३-राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या नागरिकांसाठी आहे. या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच ही अधिसूचना राज्य व केंद्र शासनाचे कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम इतर प्रतिष्ठान यांनाही लागू राहील, असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे २३ एप्रिलला प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.

Public Holiday
April Bank Holiday: पुढच्या आठवड्यात बॅंकांना किती सुट्ट्या असणार? RBI ने दिली यादी; वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com