April Bank Holiday: पुढच्या आठवड्यात बॅंकांना किती सुट्ट्या असणार? RBI ने दिली यादी; वाचा

RBI Update: एप्रिल महिन्यात बँकांना अनेक सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. आरबीआयने दिलेल्या यादीनुसार सलग काही दिवस बँका बंद राहतील, त्यामुळे ग्राहकांनी आधीच नियोजन करावे.
Bank Holidays April 2026
April Bank Holidaygoogle
Published On

एप्रिल महिन्यात तुम्हाला बॅंकेसंबंधीत महत्वाची कामं करायची असतील तर थांबा. ही महत्वाची बातमी तुमच्याचसाठी आहे. कारण एप्रिल महिन्यात बॅंकांना भरमसाठ सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे महत्वाची कामं करताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात. पुढील बातमीत आपण याच्या तारखा जाणून घेणार आहोत.

एप्रिल महिन्यात प्रादेशिक सण, राष्ट्रीय सुट्ट्या आणि आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमुळे बॅंका सलग बंद असणार आहेत. त्यामुळे तुमची धावपळ होऊ नये म्हणून भारतीय रिझर्व्ह बॅंकेने काही सुट्ट्या जाहीर केलेल्या दिवसांची यादी दिली आहे. यामध्ये १२ ते १८ एप्रिल दरम्यान सुट्ट्या असणार आहेत. १२ एप्रिलला रविवार असल्यामुळे ही सुट्टी असेल. त्यानंतर १४ ते १६ एप्रिल दरम्यान विविध राज्यांमध्ये सणांमुळे बॅंकांना सुट्ट्या असतील.

१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त देशातल्या बऱ्याच शहरांमध्ये बॅंका बंद राहतील. तसेच १५ एप्रिल रोजी हिमाचल दिवस असल्यामुळे कोलकाता, कोची, शिमला आणि गुवाहाटी जवळच्या बॅंकेना सुट्टी असणार आहे. पुढे १६ एप्रिलला बोहाग बिहू सणामुळे बॅंका बंद राहतील.

Bank Holidays April 2026
Mini Thailand Tourism : भारतात लपलयं मिनी थायलंड, दृश्य पाहून 99 टक्के लोकांना अजूनही माहीत नाही

पुढच्या आठवड्यात १९ एप्रिलला रविवार आहे. त्यामुळे या दिवशी सुट्टी असणार आहे. तर २१ ते आणि २१ एप्रिलला कर्नाटक आणि त्रिपुरा या ठिकाणी असलेल्या सणांमुळे बँकिंग सेवा बंद ठेवण्यात येतील. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात २५ एप्रिलला चौथा शनिवार आणि २६ एप्रिलला रविवार असल्यामुळे सलग दोन दिवस बँका बंद राहतील. त्यामुळे संपूर्ण महिनाभरात बँकिंग सेवा अनेकदा बंद राहण्यार आहेत.

ग्राहकांना सल्ला देण्यात येतो की, सुट्ट्यांच्या काळात मोबाइल बँकिंग, नेट बँकिंग आणि UPI सारख्या डिजिटल सेवांचा वापर करावा. तसेच रोख रकमेची गरज असल्यास एटीएम किंवा कॅश डिपॉझिट मशीनचा उपयोग करावा. आपल्या शहरातील सुट्ट्यांची अचूक माहिती जाणून घेण्यासाठी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आधीच नियोजन करणे फायद्याचे ठरेल.

Bank Holidays April 2026
Monday Horoscope: संगीताकडे आकर्षण वाढेल, 5 राशींना जाणवेल पैशाची तंगी; वाचा सोमवारचे राशीभविष्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com