Sakshi Sunil Jadhav
तुम्हाला थायलंडला फिरायला जायचं असेल, पण बजेटमुळे तुम्हाला जाता येत नसेल तर ही माहिती वाचाच.
हिमाचल प्रदेशातील एक सुंदर ठिकाण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. Jibhi या हिल स्टेशनला मिनी थायलंड म्हणून ओळखलं जातंय.
निसर्गरम्य दृश्य, शांत वातावरण आणि खास नदीचा नजारा यामुळे पर्यटकांना या परदेशात फिरण्याचा फील येतो.
Jibhi येथे तुम्हाला दोन मोठ्या खडकांच्या मधून वाहणारी नदी दिसेल जी थायलंडमधल्या नदीसारखी वाटेल.
दरवर्षी देश-विदेशातून हजारो पर्यटक येथे भेट देतात. हिरवेगार जंगल, शांत नदी आणि धबधबे यामुळे हे ठिकाण खूपच आकर्षक वाटेल.
लोकेशन सांगायचं झालं तर हे ठिकाण Himachal Pradesh मधल्या कुल्लू जिल्ह्यात वसलेलं आहे. शिमल्यापासून या ठिकाणी पोहोचण्यासाठी जवळपास 5 ते 6 तास लागतात.
Joginder Nagar हे जवळचं रेल्वे स्टेशन आहे. ते अंदाजे 100 किमी अंतरावर आहे. कमी बजेटमध्ये इंटरनॅशनल ट्रिपचा अनुभव घ्यायचा असेल तर हे ठिकाण बेस्ट आहे.
निसर्गाच्या सान्निध्यात सुंदर फोटो काढण्यासाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. शहराच्या गोंगाटापासून लांब, शांत आणि रिलॅक्स वाटण्यासाठी हे परफेक्ट डेस्टिनेशन आहे.