Public Holiday : पुढच्या गुरूवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी, शाळा-सरकारी कार्यालये राहणार बंद

maharashtra government public holiday 15 jan 2026 : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १५ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मतदान असलेल्या भागात शाळा व सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत.
Public Holiday
Public HolidaySaam Tv
Published On

Maharashtra public holiday for municipal elections : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडालाय. १५ जानेवारी रोजी २९ महापालिकेसाठी मतदान होणार आहे. आयोगाकडून मतदान प्रक्रियेला वेग आलाय. महापालिका निवडणुका सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने १५ जानेवारी २०२६ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

Negotiable Instruments Act अंतर्गत राज्य सरकारने महाराष्ट्रात १५ जानेवारी, गुरूवारी सुट्टी जाहीर केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत येणाऱ्या मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील जिल्ह्यांसह पुणे आणि राज्यातील २९ महानगरपालिकेत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी महापालिकेचे मतदान होणार आहे, त्या सर्व ठिकाणी गुरूवारी शाळा, सरकारी कार्यलयाला सुट्टी देण्यात आली आहे.

Public Holiday
Accident : भरधाव थारने ६ जणांना चिरडले, संतापलेल्या जमावाने कार पेटवली, रस्त्यावरच राडा

सरकारने डिसेंबरमध्ये राज्य सरकारने २०२६ मधील २४ सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली होती. त्या यादीमध्ये १५ जानेवारीच्या सुट्टीचा समावेश नव्हता. सार्वजनिक सुट्टी फक्त महापालिका निवडणुका होत असलेल्या ठिकाणीच असेल, असे राज्य सरकारकडून एका प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे. दरम्यान, १५ जानेवारी रोजी बँका सुरू राहणार असल्याचे समजतेय. कारण, आरबीआयकडून अद्याप १५ जानेवारीच्या सुट्टीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे शेअर बाजार आणि बँका १५ जानेवारी रोजी सुरूच राहणार आहेत.

Public Holiday
Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस नागपूरचे, मुंबईत जन्माला आल्याशिवाय प्रॉब्लेम कळणार नाही, राज ठाकरे मुख्यमंत्र्यांवर कडाडले

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या सर्व महापालिकेचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येत आहे. ३० डिसेंबर २०२५ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची परवनागी होती. तर २ जनेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेता येत होता. मुंबई आणि इतर महापालिकेसाठी राज्यात प्रचार वेगात सुरू आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी भाजप-शिंदेसेना आणि ठाकरेसेना-मनसे यांच्यात चूरस पाहायला मिळत आहे. १६ जानेवारी रोजी राज्यात कोण कोणत्या महापालिकेवर कब्जा मिळवतो, हे निश्चित होणार आहे. सध्या प्रचार अंतिम टप्प्यात आहे.

Public Holiday
Ladki Bahin Yojana : महापालिकेच्या मतदानाआधी लाडकीच्या खात्यावर ₹३००० येणार, भाजप नेत्याचा दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com