Raj Thackeray and Uddhav Thackeray interview BMC Election 2026 : देवेंद्र फडणवीस आणि इथके अनेक नेते मुंबईतील नाही, बाहेरचे आहेत, त्यांना येथील प्रॉब्लेम समजणार कसे? मुंबईचे प्लॉल्बेम प्रश्न समजून घ्यायला मुंबईतच जन्म घ्यावा लागतो, असा घणाघात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी 'दैनिक सामना'साठी राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची संयुक्त मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
त्यांनी महाराष्ट्राचं 'डेथ वॉरंट' काढलंय. मराठी माणसाच्या सहीनं मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं जातंय! असा सवाल संजय राऊत यांनी राज ठाकरेंना केला. यावर बोलताना राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत. बाकीचेही सगळे बाहेरचेच आहेत. त्यांनी आपलं मत समजून सांगताना एक उदाहरण दिले. मी एकदा स्वीत्झर्लंडला गेलो होतो. तिथे मी तो देश पाहत होतो. गाड्या फिरतायत, सगळ्यांकडं उत्तम नोकऱ्या आहेत, सुंदर रस्ते आहेत, उत्तम निसर्ग आहे. सगळं सगळं व्यवस्थित छान. हे सगळं पाहताना माझ्या मनात पहिला प्रश्न आला की, इथला विरोधी पक्ष काय करतो? म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर काय सांगत असेल, की मी तुम्हाला हे देईन, मी तुम्हाला ते देईन ... त्या कल्पनेच्या बाहेर होतो मी. मुंबईत मुंबईकरांना काय पाहिजे, हे मला असं वाटतं की तुम्हाला तिथं जन्माला आल्याशिवाय कळणार नाही. बाहेरून येऊन जेव्हा तुम्ही एखादा देश बघता, शहर बघता ना, तुम्हाला समजणारच नाहीत की तिथले प्रश्न काय आहेत ते? उदाहरणार्थ समजा, तुमचा गृहनिर्माण मंत्री किंवा पीडब्ल्यूडी मिनिस्टर किंवा अजून कोणीतरी हे जेव्हा बाहेरचे असतात, ते जेव्
भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नयेत. ते बैलगाडी घेऊन गेले होते ना अजित पवारांच्या विरोधात. त्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे घेऊन येतोय म्हणून. त्याचं काय झालं? आता म्हणतात की, कोर्टात केस चालू आहे. अरे मग द्या ना ते पुरावे… कसं आहे, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून. या लेव्हलला आता ते आलेत. तुमच्याकडे काय चालू आहे ते एकदा बघा. या देशात कोणीही राजकारणात सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. सत्ता बदलत असतात. काळ हा सगळ्या गोष्टी बघत असतो. उद्या ज्या दिवशी हे बदलेल, त्यावेळी सगळं बाहेर येणारच आहे. फक्त आपण वाट बघायची, असे राज ठाकरे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.