

MMRDA Infrastructure Airoli–Katai Elevated Road : कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबईहून ये जा करणाऱ्या लाखो वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई आणि उपनगरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी MMRDA कडून ऐरोली-कटाई एलिव्हेटेड रोड तयार केला जात आहे. याचं काम अखेरच्या टप्प्यात असून आतापर्यंत ८० टक्के पूर्ण झाल्याचे सांगण्यात येतेय. हा रस्ता तयार झाल्यानंतर नवी मुंबईहून कल्याण-डोंबिवली हा प्रवास फक्त १५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. या एलिव्हेटिडमुळे वाहतूक कोंडीमधून सुटका मिळणार आहे.
कल्याण डोंबिवली ते नवी मुंबई या मार्गावर रस्त्याने प्रवास करण्यासाठी सध्या दीड तासांचा वेळ लागतो. ठाण्याहून नवी मुंबईकडे प्रवास करताना ट्रॅफिक जॅममुळे अनेकजण त्रस्त आहेत. या मार्गावर सध्या ट्रान्स-हार्बर लोकल ट्रेन हा एकमेव वेगवान पर्याय आहे. पण वाढत्या प्रवासी वाहतुकीमुळे लोकलवरही भार आला आहे. गर्दीवर तोडगा काढण्यासाठीच ऐरोली-कटाई नाका उन्नत रस्ता सुरू करण्यात आलाय. हा रस्ता सुरू झाल्यास दीड तासाचा प्रवास फक्त १५ मिनिटांत पूर्ण होणार आहे.
ऐरोली-मुंब्रा प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी MMRDA ने मुंब्रा-कटाई नाका उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला. हा मार्ग देसाई खाडीतून जात आहे. कनेक्टिव्हिटीसाठी पारसिक टेकड्यांमधून एक भूमिगत बोगदा बांधण्यात आलाय. २०१८ मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ठाणे-बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पर्यंत ३.४८ किमी लांबीचा एलिव्हेटेड रस्त्याचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली पुलापासून जोडणारा रस्त्यांचा समवेश आहे. ६.७१ किमी लांबीचा हा मार्ग देसाई खाडी ओलांडेल. २०२६ वर्षाच्या अखेरपर्यंत हा रस्ता सर्वांसाठी खुला होईल, असा अंदाज वर्तवला जातोय.
बोगद्यामधून जाणारारस्ता चार पदरी आहे. त्यामुळे डोंबिवलीजवळील ऐरोली ते कटाई नाका हा प्रवास वेगात होईल. हा मार्ग खुला झाल्यानंतर ऐरोली परिसरातील जड वाहनांची वाहतूक कमी होईल. मुंबई ते कल्याण आणि कल्याण ते मुंबई अशी जाणारी वाहने थेट या एलिव्हेटेड रस्त्याचा वापर करू शकतील. यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.