Maharashtra Politics : महाराष्ट्र हादरला! राजकीय वादातून काँग्रेसच्या नेत्याची हत्या, धारदार शस्त्राने भरचौकात वार

Hidayat Patel death : अकोल्यातील काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर राजकीय वादातून चाकू हल्ला झाला होता. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले असून पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे.
Akola News
Late Congress leader and state vice president Hidayat Patel, who died after a knife attack in Akola.Saam tv
Published On

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Congress state vice president Hidayat Patel death news : काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचं उपचारादरम्यान निधन झाले. मंगळवारी दुपारी हिदायत पटेल यांच्यावर राजकीय वादातून जीवघेणा चाकू हल्ला झाला होता. हिदायत पटेल 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते. हिदायत पटेल सध्या काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते.

मंगळवारी रात्री उशिरा हिदायत पटेल यांच्यावर हल्ला करणाऱ्या उबेद पटेल याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. उबेद पटेल हा 24 मे 2019 मध्ये हत्या करण्यात आलेल्या मोहाळा गावातील भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांचा पुतण्या आहे. 2019 मध्ये लोकसभेचा निकाल लागल्यानंतर हिदायत पटेल यांचं गाव असलेल्या मोहाळा गावात राजकीय वादातून भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात हिदायत पटेल यांच्यासह 10 आरोपी होतेय. काल दुपारच्या दोन वाजताच्या नमाजनंतर हिदायत पटेल मोहाळा गावातील मरकज मशिदीत नमाज पडून बाहेर येत असताना उबेदने हिदायत पटेल यांच्यावर चाकू हल्ला केला होता. पटेल यांच्या मानेवर आणि चेहऱ्यावर चाकूने वार करण्यात आले होते.

Akola News
Mumbai Local :वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, पश्चिम रेल्वेवर 215 लोकल रद्द, कारण काय?

कोण आहेत हिदायत पटेल ?

हिदायत पटेल हे सध्या प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. अकोल्यातील काँग्रेसचा मोठा मुस्लिम चेहरा म्हणून हिदायत पटेल यांना ओळखलं जात होते. अकोला जिल्हा काँग्रेसचे आठ वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. पटेल 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार होते. पटेल 2014 मध्ये दुसऱ्या स्थानावर. तर 2019 मध्ये तिसऱ्या स्थानावर राहिले होते. हिदायत पटेल जिल्ह्यातील मोठे सहकार नेते. 25 वर्षांपासून जिल्हा बँकेचे संचालक राहिले. सध्या अकोट तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष होते. 35 वर्षांपासून जिल्ह्यातील महत्वाच्या अकोट बाजार समितीचे माजी सभापती आणि सध्या संचालक राहिलेत.

Akola News
Mumbai Election Violence: मुंबईमध्ये निवडणूक प्रचारात राडा, शिंदेंच्या समर्थकांकडून २ जणांना बेदम मारहाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com