Mumbai Election Violence: मुंबईमध्ये निवडणूक प्रचारात राडा, शिंदेंच्या समर्थकांकडून २ जणांना बेदम मारहाण

Mumbai election violence news : मुंबईतील दहिसरमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान दोन युवकांना बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. व्हायरल व्हिडिओची दखल घेत MHB पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडालाय. याच प्रचाराचा गालबोट लागलेय. निवडणूक प्रचारावेळी दोन जणांना बेदम मारहाण झाल्याचे समोर आलेय. मुंबईतील दहिसरमध्ये ही घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समर्थकांच्या हातात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचे पोस्टर होते. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण झाले होते. व्हिडिओची दखल घेत MHB पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. संबंधितांची ओळख पटवून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.

दहिसरमधील MHB पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक १ मध्ये मारहाण झाली. विठ्ठलवाडी सोसायटीजवळ शिवसेना (शिंदे गट) समर्थकांकडून युवकांना मारहाण झाल्याची सूत्रांनी माहिती दिली. लाथा-बुक्क्यांसह पक्षाच्या झेंड्यांनीही मारहाण केल्याचा आरोप कऱण्यात आला आहे. शिवसेना उमेदवार रेखा राम यादव यांच्या समर्थकांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com