Maharashtra Politics : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; राज्याच्या राजकारणात खळबळ

akola political News : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झालाय. या घटनेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीये.
Akola News
akola political NewsSaam tv
Published On
Summary

सर्वत्र महापालिका निवडणुकीची धामधूम

अकोल्यात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला

नेत्यावर हल्ला झाल्याने परिसरात खळबळ

अक्षय गवळी, साम टीव्ही

राज्यात महापालिका निवडणुकींचा रणसंग्राम पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत काही ठिकाणी वादाचे फटाके देखील फुटले आहेत. सोलापूरमध्ये काही दिवसांपूर्वी मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याची घटना घडली. सोलापूरमधील मनसेच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येची घटना ताजी असताना अकोल्यात मंगळवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्याने अकोल्यात खळबळ उडाली आहे.

Akola News
मुंबईत हायव्हॉल्टेज ड्रामा; ठाकरेंच्या समोरच भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

अकोल्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि अकोल्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झालाय. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या मोहाळा गावात त्यांच्यावर मंगळवारी जीवघेणा हल्ला झाला. हिदायत पटेल यांच्यावरील हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Akola News
भ्रष्टाचारी तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवा; उद्धव ठाकरेंची जोरदार टीका

हिदायत पटेल 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते. हिदायत पटेल सध्या काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. गावातील राजकीय संघर्षातून मतीन पटेल गटाने हिदायत पटेल यांच्यावर चाकू हल्ला केल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी असलेल्या हिदायत पटेल यांना अकोटमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, पुढील उपचारासाठी अकोल्याला पाठवण्यात आले आहेत.

Akola News
मुंबई हादरली! पिस्तुल काढलं अन् स्वत:वर धाड धाड गोळ्या झाडल्या, कांदिवलीत ४५ वर्षीय व्यक्तीचा टोकाचा निर्णय

तत्पूर्वी, ‌नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत हिदायत पटेल यांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याचा अकोट नगरपालिकेतील काँग्रेसच्या नगराध्यक्ष उमेदवार अलका बोडके यांनी आरोप केला होता. हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी पोलिसांचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com