मुंबईत हायव्हॉल्टेज ड्रामा; ठाकरेंच्या समोरच भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

uddhav thackeray : मुंबईच्या बोरिवलीत आज हायव्हॉल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. ठाकरेंच्या समोरच भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी केल्याचे दिसून आले.
uddhav thackeray news
uddhav thackeray Saam tv
Published On
Summary

मुंबईत राजकीय वातावरण तापलं

ठाकरेंची बोरिवलीला हजेरी

ठाकरेंचा ताफा अडवून महायुतीच्या कार्यकर्त्यांचा डान्स

संजय गडदे, साम टीव्ही

महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधक आणि सत्ताधारी पक्षांनी प्रचारसभा आणि कार्यालय उद्घाटनाचा धडाका लावला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मुंबई पिंजून काढायला सुरुवात केली आहे. वचननामा जाहीर केल्यानंतर ठाकरेंनी आज बोरिवलीत हजेरी लावली. याच बोरिवलीत ठाकरेंच्या समोर ठाकरे गट-मनसे आणि भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले.

बोरिवलीत मनसे शाखेच्या भेटीदरम्यान ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित केलं. या कार्याक्रमानंतर ठाकरेंच्या समोर भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याची घटना घडली. या घोषणाबाजीने घटनास्थळी काही वेळासाठी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

uddhav thackeray news
महिला IAS अधिकाऱ्याच्या घरात देहविक्रीचं रॅकेट; ४ तरुणींसोबत ५ तरुण आढळले नको त्या अवस्थेत

ठाकरे कारने निघाले, तेवढ्यात महायुती रॅली धडकली

बोरिवली पूर्व येथे देखील मनसेच्या शाखेत ठाकरेंनी हजेरी लावली. यावेळी ठाकरेंनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. भाषण झाल्यानंतर ठाकरे कारने घरी निघताना भाजप आणि शिंदेंच्या सेनेची प्रचार रॅली धडकली. यावेळी ठाकरे गट आणि शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं.v

uddhav thackeray news
युद्ध पेटलं! राष्ट्राध्यक्षांसह पत्नीला ठेवलं ओलिस; डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ

कार्यकर्त्यांनी एकमेकांना डिवचले

बोरीवली पूर्वेतील सोना टॉकीजवळ ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजप-शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना डिवचू लागले. त्यानंतर त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली.

उद्धव ठाकरे यांच्या ताफा थांबवून कारच्या समोर शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी डान्स केला. या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना पांगवले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर उद्धव ठाकरे यांचा ताफा दुसरीकडे निघाला. दोन्ही गट आमनेसामने आल्याने काही काळ तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांच्या मध्यस्थींना मोठा राडा टळल्याचं पाहायला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com