भ्रष्टाचारी तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवा; उद्धव ठाकरेंची जोरदार टीका

uddhav thackeray News : उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे. महायुती भ्रष्टाचारी म्हणत ठाकरेंनी निशाणा साधला आहे.
udddhav thackeray news
udddhav thackeray Saam tv
Published On
Summary

उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीसाठी सक्रिय

ठाकरेंकडून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू

ठाकरेंची भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून महायुतीवर टीका

संजय गडदे, साम टीव्ही

उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. उद्धव ठाकरे प्रत्येक प्रभागात जाऊन कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधत आहे. तसेच उमेदावारांच्या शाखा आणि कार्यालयाला देखील भेटी देत आहेत. ठाकरेंनी आज मुंबईतील प्रभाग ३ मध्ये पक्षाच्या उमेदवाराच्या कार्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना महायुतीवर जोरदार टीका केली. भ्रष्टाचारी तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवा, असं म्हणत ठाकरेंनी टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, ही लढाई एका व्यक्तीची नाही. तर आपल्या सर्वांची आहे. गद्दारांना गाडावं लागेल. आपल्यासमोर महायुती आहे. ही महायुती भष्ट्राचार करणाऱ्यांची युती आहे. ज्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला. तेच त्यांच्यासोबत आहेत. भ्रष्ट तितुका मेळवावा, भारतीय जनता पक्ष वाढवावा' .

udddhav thackeray news
महिला IAS अधिकाऱ्याच्या घरात देहविक्रीचं रॅकेट; ४ तरुणींसोबत ५ तरुण आढळले नको त्या अवस्थेत

'महिलांना शौचालयासाठी उघड्यावर जावे लागते'

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मधील उमेदवार रोशनी कोरे गायकवाड यांनी केंद्र आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. 'आज मोदीसाहेब घरघर शौचालय असल्याचा दावा करतात. मात्र प्रत्यक्षात केतकी पाडा परिसरात आजही महिलांना उघड्यावर शौचाला जावे लागत आहे,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

udddhav thackeray news
मुंबईत हायव्हॉल्टेज ड्रामा; ठाकरेंच्या समोरच भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

“माझ्या भगिनींसाठी शौचालय उभारणारच आहे,” असा ठाम निर्धार व्यक्त करत त्यांनी परिसरातील गटारांची दुरवस्था, स्वच्छतेचा अभाव याकडे लक्ष वेधले. “मी नगरसेविका नसतानाही स्वतः पुढाकार घेऊन सफाई आणि कचरा उचलण्याची कामे करून घेत असते,” असे सांगत त्यांनी आपल्या सामाजिक कामांचा आढावा मांडला. या कामांच्या बळावर आपण पाच ते सात हजार मतांनी विजयी होऊ, असा विश्वास रोशनी कोरे गायकवाड यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com