

बायकोची बहीण मेहुणीवर बराचसा हक्क असतो. तिच्याकडे अगदी जवळकीच्या नात्याने पाहाण्यात येते. 'मेहुणी ही अर्धी बायको असते' असे अनेकदा गमंततीत म्हटले जाते. पण भावोजी अन् मेहुणी या नात्याला काळीमा फासल्याची घटना बिहारमध्ये उघडकीस आली आहे. भावोजीने १४ वर्षाच्या मेहुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. मेहुणी गर्भवती राहिली, तिने एका बाळाला जन्म दिला, पण ते ४ दिवसात मृत झाले. मेहुणीला फसवल्याचे अन् जबरदस्ती केल्याचे उघडकीस येईल या भीतीने नराधम मेहुणा फरार झाला. ही घटना बिहारमधील चंपारणमध्ये घडली आहे. या प्रकरणी भावोजीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
लग्नानंतर बिहारमधील चंपारण येथील व्यक्तीची १४ वर्षांच्या मेहुणीवर वाईट नजर होती. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिचे लैंगिक शोषण केले. १४ वर्षाची मुलगी गर्भवती राहिल्यानंतर संपूर्ण कुटुंब स्तब्ध झाले. तिने कुटुंबाला याबद्दल सांगितले. त्या मुलीने बाळाला जन्म दिला, पण ४ दिवसात नवजात बाळाचा मृत्यू झाला. निष्पाप बाळाच्या मृत्यूने कुटुंब आणखी हादरले. आपलं पाप काळं कृत्य उघडकीस आल्याचे लक्षात येताच नराधम भावोजी पळून गेला. त्यानंतर कुटुंबाने जावयावर गुन्हा दाखल केला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पश्चिम चंपारणमधील मजौलिया पोलीस नराधमाचा शोध घेत आहेत.
पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. १४ वर्षाच्या पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीसोबत त्याचं लग्न झाले होते. लग्नानंतर सासरवाडीत आल्यानंतर त्याची नजर मेहुणीवर पडली. त्याने मेहुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् अत्याचार केले. मुलगी लहान असल्याने तिला या सर्व गोष्टी सुरूवातीला समजल्या नाहीत. पण गर्भवती राहिल्यानंतर कुटुंबाच्या हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयने सांगितले की, पीडित मुलीच्या कुटुंबाने जावयाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याचा शोध सुरू आहे. तो लवकरच पोलिसांच्या ताब्यात असेल. दरम्यान, तक्रारीत पीडितेच्या वडिलांनी म्हटले आहे की, मला दोन मुली आहेत. माझ्या पत्नीचे आधीच निधन झाले आहे. मी माझ्या मोठ्या मुलीचे लग्न चंपाटिया येथील एका तरुणाशी लावले. माझा जावई आमच्या घरी वारंवार येत होते. मी नेहमीच कामावर असेन आणि फक्त माझी दुसरी मुलगी घरी एकटी होती. त्याने माझ्या १४ वर्षांच्या दुसर्या मुलीला कधी जाळ्यात ओढळे हे कोणालाही कळले नाही. ती गर्भवती असताना आम्हाला कळले. ३१ डिसेंबर रोजी तिने एका मुलाला जन्म दिला, परंतु चार दिवसांनी त्या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर जावई पसार झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.