BJP AIMIM alliance : राज्याच्या राजकारणात ट्विस्ट, भाजपनं केली एमआयएमशी युती, ठाकरेंनाही घेतलं सोबत, वाचा नेमकं काय घडलं

BJP AIMIM alliance in Akot municipal council : अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत भाजपने एमआयएमसोबत आघाडी करत ‘अकोट विकास मंच’ स्थापन केला आहे. या युतीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले आहे.
BJP–Shiv Sena Alliance
BJP–Shiv Sena Alliance saam tv
Published On

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत भाजपने 'एमआयएम'सोबत युती केली आहे. नगरपालिकेत बहूमत नसलेल्या भाजपने 5 नगरसेवक असलेल्या 'एमआयएम'ला सोबत घेतले. त्याशिवाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनाही या ठिकाणी सत्तेत राहणार आहे. भाजपने स्थापन केलेल्या 'अकोट विकास मंचा'त एमआयएम दोन्ही सेना, दोन्ही राष्ट्रवादी, आणि बच्चू कडूंची 'प्रहार जनशक्ती पार्टी' असणार आहे. काँग्रेस आणि वंचित हा पक्ष या ठिकाणी विरोधात राहणार आहे.

'पार्टी विथ डिफरंस' अशी ओळख सांगणाऱ्या भाजपने सत्तेसाठी सारीच तत्व गुंडाळून ठेवलीत का?, असा प्रश्न अकोल्यात उपस्थित होतोय. अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये सत्तेसाठी चक्क भाजपने 'एमआयएम'सोबत आघाडी केली. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अकोटमध्ये भाजपच्या माया धुळे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात. मात्र, 35 सदस्यांच्या नगरपालिकेत भाजपला बहुमत मिळालं नाहीये. अकोटमध्ये 35 पैकी 33 जागांची निवडणूक झालीय. यात भाजपला 11 जागा मिळाल्यात.

BJP–Shiv Sena Alliance
Maharashtra Politics : महाराष्ट्र हादरला! राजकीय वादातून काँग्रेसच्या नेत्याची हत्या, धारदार शस्त्राने भरचौकात वार

आता अकोट नगरपालिकेत भाजपने आपल्या नेतृत्वात 'अकोट विकास मंच' स्थापन केलाय. या 'अकोट विकास मंचा'त भाजपनंतर सर्वाधिक 5 जागा जिंकणारा एमआयएम भाजपचा मित्रपक्ष झालाय. याशिवाय या आघाडीत ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष सहभागी झालाय. मंगळवारी या नव्या आघाडीची नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. भाजपचे नगरसेवक रवि ठाकूर या नव्या आघाडीचे गटनेते असणारायेत. या आघाडीतील सर्वच पक्षाच्या नगरसेवकांना आता भाजपचा 'व्हिप' पाळावा लागणारे आहे. 13 जानेवारीला होत असलेल्या उपनगराध्यक्ष आणि स्विकृत सदस्यांच्या निवडीत ही आघाडी एकत्रितपणे मतदान करणारे आहेत.

BJP–Shiv Sena Alliance
Mumbai Local :वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, पश्चिम रेल्वेवर 215 लोकल रद्द, कारण काय?

या आघाडीचे आता सध्याच्या 33 सदस्य संख्येत 25 सदस्य झालेयेत. तर नगराध्यक्षा माया धुळे या 26 व्या सदस्य आहेत. अकोट नगरपालिकेत काँग्रेसचे 6 आणि वंचितचे 2 सदस्य विरोधी पक्षात असणार आहेत. अकोट नगरपालिकेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवार फिरोजाबी सिकंदर राणा यांना भाजपच्या माया घुळे यांनी 5271 मतांनी पराभूत केले होतेय. अकोट नगरपालिकेत भाजपनंतर एमआयएमचे सर्वाधिक 5 नगरसेवक विजयी झालेयेत. विधानसभेत 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा नारा देणाऱ्या भाजपने अकोटमध्ये थेट 'एमआयएम'शी आघाडी केल्याने ते विरोधकाच्या टिकेला कसे उत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणारेय.

BJP–Shiv Sena Alliance
Mumbai-Pune Expressway : नव्या वर्षाचं गिफ्ट! मुंबई-पुणे प्रवास सुसाट, मुख्यमंत्र्यांनी दिले थेट आदेश

अकोट नगरपालिकेतील पक्षीय बलाबल :

एकूण जागा : 35 निकाल जाहीर : 33 (2 जागांची निवडणूक नंतर होणार)

पक्षीय बलाबल :

भाजप : 11

काँग्रेस : 06

शिंदेसेना : 01

उबाठा : 02

वंचित : 02

अजित पवार राष्ट्रवादी : 02

शरद पवार राष्ट्रवादी : 01

प्रहार : 03

एमआयएम : 05

भाजपच्या नेतृत्वात बनलेल्या 'अकोट विकास मंचा'चे पक्षीय बलाबल :

भाजप : 11

एमआयएम : 05

शिंदेसेना : 01

उबाठा : 02

अजित पवार राष्ट्रवादी : 02

शरद पवार राष्ट्रवादी : 01

प्रहार : 03

एकूण : 25

BJP–Shiv Sena Alliance
Mumbai-Pune Expressway : नव्या वर्षाचं गिफ्ट! मुंबई-पुणे प्रवास सुसाट, मुख्यमंत्र्यांनी दिले थेट आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com