Mumbai-Pune Expressway : नव्या वर्षाचं गिफ्ट! मुंबई-पुणे प्रवास सुसाट, मुख्यमंत्र्यांनी दिले थेट आदेश

Missing link project travel time reduction : मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक १ मे २०२६ पासून सुरू होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर प्रवासाचा वेळ सुमारे ३० मिनिटांनी कमी होणार आहे.
Mumbai Pune Expressway
Mumbai Pune Expressway Saam TV Marathi News
Published On

Mumbai Pune Expressway Missing Link Opening Date : मुंबई पुणे प्रवासातील वाहतूक कोंडीतून थोडासा दिलासा मिळणार आहे. कारण, १ मे २०२६ पासून मिसिंग लिंक पूर्णपणे खुला करण्यात येणार आहे. एमएसआरडीसीचे अधिकारी राजेश पाटील यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना मिसिंग लिंकच्या कामाबाबत माहिती दिली. वाहतूक कोंडी कमी कऱण्यासाठी मिसिंग लिंक १ मे रोजी सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे. लोणावळा-खोपोली परिसरातील घाटमार्गावर वाहनांचा वेग कमी होत असल्यामुळे प्रवासाचा वेळ वाढत होता. त्यावर उपाय म्हणून 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचा प्रारंभ केला.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील 'मिसिंग लिंक'चे काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मिसिंग लिंक सुरू झाल्यास वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. त्याशिवाय प्रवासाचा वेळही ३० मिनिटांनी कमी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि पुणे या दोन शहरातील प्रवासाचा वेळ वाढला आहे. वाहनांची संख्या वाढल्यामुळे घाटामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे तास ते दीड तासांचा वेळ वाढला. पण आता मिसिंग लिंक सुरू झाल्यास मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार आहे.

Mumbai Pune Expressway
Mumbai Local :वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, पश्चिम रेल्वेवर 215 लोकल रद्द, कारण काय?

मिसिंग लिंकच्या कामासोबतच अत्याधुनिक केबल स्टेड पुलाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. पुलाच्या दोन टोकांना जोडण्याचे काम वेगाने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) दिले आहेत. मार्च ते एप्रिल महिन्यात ही दोन्ही कामे पूर्ण होतील, असे अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगीतले. दरम्यान, मिसिंग लिंक सुरू झाल्यास पुण्यातील गुंतवणूक वाढवण्यास याचा लाभ होईल, असे उद्योग जगतामधील विश्लेषकांचे मत आहे.

Mumbai Pune Expressway
Mumbai Election Violence: मुंबईमध्ये निवडणूक प्रचारात राडा, शिंदेंच्या समर्थकांकडून २ जणांना बेदम मारहाण

मिसिंग लिंकचे काम नेमकं कसे केले जाणार ?

खालापूर टोल नाका ते खोपोली एक्झिट हा महामार्ग सहापदरीवरून आठपदरी केला जात आहे. खोपोली ते कुसगाव या १३.३ किमीच्या मार्गावर सुधारणा करून दोन बोगदे आणि दोन मोठे पूल बांधले जात आहेत. यामुळे एक्सप्रेस वेचे अंतर ६ किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळेच मुंबई किमान अर्ध्या तासांनी पुण्याच्या जवळ येणार आहे.

Mumbai Pune Expressway
Japan earthquake : भूकंपाने जपान हादरले, ६.२ तीव्रतेचे जोरदार झटके, भल्या पहाटे जमीन हादरली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com