

Japan Earthquake Lastet News : भल्या पहाटे नागरिक झोपेत असतानाच जपान भूकंपाने हादरले. ६.२ रिश्टर स्केलच्या तीव्रतेने जमीन हादरल्यामुळे नागरिक प्रचंड घाबरले. पश्चिम चुगोकू प्रदेशात मंगळवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. जपान हवामानशास्त्र संस्थेच्या म्हणण्यानुसार, पश्चिम चुगोकूमध्ये सुरुवातीला ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतर लागोपाठ अनेक मोठे धक्के जाणवले. या शक्तिशाली भूकंपामुळे अद्याप कोणत्याही नुकसान झाल्याचे वृत्त आहे. त्याशिवाय भूकंपानंतरही अद्याप त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.
जपानमध्ये पहाटे झालेल्या पहिल्या भूकंपाचे केंद्र पूर्व शिमाने प्रीफेक्चरमध्ये होते, असे हवामानशास्त्र संस्थेने सांगितलेय. त्याशिवाय त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचेही सांगण्यात आले. चुगोकू इलेक्ट्रिक पॉवर हे भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून ३२ किमी अंतरावर आहे. जपानच्या अणु नियमन प्राधिकरणाने सांगितले की या प्रकल्पात कोणतीही अनियमितता नाही. दरम्यान, जपानमध्ये १० मिनिटांच्या अंतराने दोन लागोपाठ भूकंपाचे हादरे बसले. आधी ६.२ तीव्रता होती, तर दुसऱ्यावेळी ५.१ तीव्रतेचे धक्के जाणवल्याची नोंद आहे.
जपान हा भूकंपप्रवण देश आहे. जगातील ६ किंवा त्याहून अधिक तीव्रतेच्या भूकंपांपैकी जवळपास २० टक्के भूकंप जपानमध्ये येत असल्याची नोंद आहे. जपानमधील नोटो द्वीपकल्पात ७.६ तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. सुदैवाने मंगळवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मोठ्या नुकसानीची किंवा जीवितहानीबाबत अद्याप कोणतेही वृत्त नाही. तरीही स्थानिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जपानमध्ये सातत्यान भूकंपाचे धक्के जाणवत आहे. ८ महिन्यांपूर्वीही जपानमध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी ९० हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले होते. जपानच्या या भागात सातत्याने भूकंपाचे धक्के होत असल्यामुळे हा भाग भूकंप प्रणव क्षेत्र म्हणून ओळखला जातो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.