Suresh Kalmadi : पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन

Suresh Kalmadi death news : पुण्याचे माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे आज पहाटे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. दुपारी पुण्यात अंत्यविधी होणार आहे.
Suresh Kalmadi : पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन
Published On

Former Pune MP Suresh Kalmadi Passes Away : पुण्याचे माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी (वय ८२) यांचे आज पहाटे साडेतीन वाजता निधन झाले. सुरेश कलमाडी यांना पुण्यात मानणारा मोठा वर्ग होता. त्यामुळे पुण्यातील राजकारणात त्यांचा दबदबा होता.

मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अंत्यविधी दुपारी ३.३० वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहे. सुरेश कलमाडी यांचे पार्थिव दुपारी दोन वाजेपर्यंत पुण्यातील कलमाडी निवासस्थानी अंत्यदर्शनसाठी ठेवले जाणार आहे.

Suresh Kalmadi : पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन
Coastal Road : कोस्टल रोडवरून श्रेयवाद! ठाकरेंच्या आरोपाला शेलारांचे प्रत्युत्तर, म्हणाले बिनडोक...

२०१० दिल्ली कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून चर्चेत आलेले कलमाडी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वादात सापडले होते. सीबीआय आणि ईडीच्या तपासात अटक झाली, मात्र अनेक प्रकरणांत निर्दोष मुक्तता मिळाली. काँग्रेस पक्षाचे माजी नेते असलेल्या कलमाडी यांनी क्रीडा आणि राजकारणात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Suresh Kalmadi : पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन
हायवेवर मृत्यूचा थरार! १०० च्या वेगात धावणारी कार अन् गाढ झोपलेला चालक, Viral Video

२०१० मधील राष्ट्रकुल क्रीडा घोटाळ्यात सुरेश कलमाडी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून आर्थिक गैरव्यवहारांचा समावेश होता. त्यामध्ये त्यांना अटकही झाली होती. पण अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर एप्रिल 2025 मध्ये त्यांना क्लीन चिट मिळाली होती. मात्र, त्यानंतर सुरेश कलमाडी हे पुण्याच्या राजकारणात कमबॅक करु शकले नाहीत. गेल्या काही वर्षांपासून ते आजारपणामुळे राजकारणापासून दूर होते.

Suresh Kalmadi : पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन
Coastal Road : कोस्टल रोडवरून श्रेयवाद! ठाकरेंच्या आरोपाला शेलारांचे प्रत्युत्तर, म्हणाले बिनडोक...

कोण होते सुरेश कलमाडी

जन्म 1 मे 1944 तामिळनाडू येथे झाला. पुण्याच्या सार्वजनिक जीवनावर दीर्घकाळ प्रभाव टाकणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे सुरेश कलमाडी. राजकारण, प्रशासन आणि क्रीडा विश्व या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. समर्थकांसाठी ते विकासाचा चेहरा होते, तर विरोधकांसाठी वादग्रस्त सत्ताकेंद्र. मात्र, पुण्याच्या राजकीय इतिहासात त्यांचे नाव कायम नोंदले गेले आहे.

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

सुरेश कलमाडी यांचे शिक्षण पुण्यातील नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. विद्यार्थी दशेपासूनच त्यांच्यात नेतृत्वगुण आणि संघटनकौशल्य दिसून येत होते. शिस्त, नियोजन आणि आत्मविश्वास या गुणांनी त्यांचा पुढील प्रवास घडवला.हवाई दलातील कारकिर्द १९६४ ते १९७२ या कालावधीत सुरेश कलमाडी यांनी भारतीय वायू दलात पायलट म्हणून सेवा बजावली. देशसेवेचा अनुभव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि निर्णयक्षमता या टप्प्यावर घडली. १९७४ मध्ये वायूदलातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी सार्वजनिक जीवनात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com