Ashish Shelar response to Uddhav Thackeray on Coastal Road : उद्धव ठाकरेंच्या पक्षात बिनडोक लोकं जास्त आहेत, असा पलटवार आशिष शेलार यांनी केला. कोस्टल रोडचे काम बीएमसीने केले, त्याची व्यवस्था आम्ही केली, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्याला शेलारांकडून प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे हे श्रेय पळवणाऱ्या टोळीचे म्होरके असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.
मुंबई महापालिका निवडणुकीत कोस्टल रोड कुणी केला, यावरून भाजप आणि ठाकरेंमध्ये आरोप प्रत्यारोप केला. कोस्टल रोडला लागणारे सर्व परवाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणले. ठाकरेंना फक्त टेंडर हवे होते. टक्केवारीसाठी ठाकरेंच्या पक्षाने बीएमसीकडे प्रस्ताव नेला, ती टक्केवारी काढू, असा हल्लाबोल शेलार यांनी केला.
भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार साम टीव्हीच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट कार्यक्रमात बोलत होते. संपादक निलेश खरे यांच्या प्रश्नांची त्यांनी मोजक्या शब्दात उत्तरे दिले. मुंबई महापालिकेतील कोस्टल रोडच्या श्रेयवादावरही शेलार यांनी यावेळी भाष्य केले. त्याशिवाय आगामी निवडणुका, सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप–प्रत्यारोप, राज्यातील सध्याची राजकीय स्थिती आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर भूमिका मांडली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.