Ladki Bahin Yojana : महापालिकेच्या मतदानाआधी लाडकीच्या खात्यावर ₹३००० येणार, भाजप नेत्याचा दावा

Ladki Bahin scheme payment before BMC elections : महापालिका निवडणुकीआधी लाडक्या बहिणींच्या खात्यावर ३,००० रुपये जमा होतील, असा दावा भाजप नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी केला आहे. या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana December Installment Date
Mukhyamantri Ladki Bahin Yojana December Installment DateSaam
Published On

Mukhyamantri Ladki Bahin Yojana December Installment Date : मुंबई, पुण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. मुंबई आणि पुणे या दोन महापालिकेकडे राज्याचे लक्ष लागलेय. ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबई महापालिकेची निवडणूक आणखी रंगतदार झाली. ठाकरे बंधूंपासून ते शिंदे अन् भाजप नेत्यांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अश्वासने दिली जात आहे. मुंबईच्या वॉर्ड २ मधून निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसळकर यांनी केलेल्या दाव्याने नव्या चर्चेला उधाण आलेय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ३००० रूपये येतील, असा वादा घोसळकर यांनी प्रचारावेळी केला आहे.

विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. आता महापालिका निवडणुकीतही भाजपकडून याचा प्रचार जोरात केला जातोय. राज्यातील लाडक्या बहि‍णींना आतापर्यंत नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे. पण डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याच्या हप्त्यांची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. १४ जानेवारी रोजी मकरसंक्रातीचा सण आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महापालिकेसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे या कालावधीतच लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे बोलले जात होते. त्यातच भाजप नेत्या तेजस्वी घोसळकर यांनी केलेल्या दाव्याने याला आणखी पाठबळ मिळाले आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana December Installment Date
Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस नागपूरचे, मुंबईत जन्माला आल्याशिवाय प्रॉब्लेम कळणार नाही, राज ठाकरे मुख्यमंत्र्यांवर कडाडले

तेजस्वी घोसळकर या मुंबई महापालिकेच्या वॉर्ड २ मधून भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्याकडून मतदारसंघात जोरदार प्रचार केला जात आहे. प्रचारावेळी त्यांनी लाडक्या बहि‍णींच्या खात्यात निवडणुकीआधी पैसे येतील, असे वक्तव्य केलेय. त्या म्हणाल्या की, देवभाऊ म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीएमसी निवडणुकीच्या मतदानापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांना मोठी भेट देतील. जानेवारी आणि डिसेंबर महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे मिळेल. अशा प्रकारे, ३,००० रुपये थेट लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर येतील. तेजस्वी घोसाळकर यांची ही फेसबूक पोस्ट सध्या चर्चेत आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana December Installment Date
Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस नागपूरचे, मुंबईत जन्माला आल्याशिवाय प्रॉब्लेम कळणार नाही, राज ठाकरे मुख्यमंत्र्यांवर कडाडले

महापालिका निवडणुकीच्या आदी तेजस्वी घोसळकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून भाजपात प्रवेश केला. तेजस्वी या दहिसरचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. २०२४ मध्ये तेजस्वी यांचे पती अभिषेक यांची फेसबुक लाईव्ह सत्रादरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

तेजस्वी यांचा सामना दहिसर वॉर्ड क्रमांक २ मधून ठाकरे बंधूंच्या संयुक्त उमेदवार धनश्री कोळगे यांच्याशी आहे. धनश्री या शिवसेनेच्या (UBT) युवा सेनेची (युवा सेना) पदाधिकारी आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण सासरे अजूनही ठाकरेंसोबतच आहेत. या वॉर्डमध्ये काय निकाल लागेल याकडे मुंबईकरांचे लक्ष लागलेय.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana December Installment Date
बिनविरोधनंतर आता बिनशर्त, अधिकृत उमेदवाराचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंना जोरदार धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com