बिनविरोधनंतर आता बिनशर्त, अधिकृत उमेदवाराचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंना जोरदार धक्का

Kalyan Dombivli election : कल्याण-डोंबिवलीत मतदानाआधी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का. अधिकृत उमेदवार रामचंद्र माने यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा देत पक्षप्रवेश केला.
Kalyan Dombivli municipal election political news
Kalyan Dombivli municipal election political newsSaam
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही प्रतिनिधी

Uddhav Thackeray candidate joins Shinde Sena : कल्याण-डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. मतदानाला अवघे काहीच दिवस शिल्लक असताना ठाकरेसेनेच्या अधिकृत उमेदवाराने शिंदेसेनेच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिलाय. एवढंच नव्हे तर खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत त्यांनी शिंदेसेनेत जाहीर प्रवेशही केलाय. रामचंद्र माने असं या उमेदवाराचं नाव आहे. दरम्यान अधिकृत उमेदवाराने शिंदेंच्या उमेदवारांला पाठिंबा दिल्याने राजकारणच फिरल्याचं चित्र आहे.

डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराचा एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा. मतदानाआधी ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसलाय. डोंबिवली मधील पॅनल क्रमांक ३० (ड) मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार रामचंद्र गणपत माने उर्फ भीमा यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला.

Kalyan Dombivli municipal election political news
Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस नागपूरचे, मुंबईत जन्माला आल्याशिवाय प्रॉब्लेम कळणार नाही, राज ठाकरे मुख्यमंत्र्यांवर कडाडले

३० (ड) मधून अर्जुन बाबू पाटील हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. पण खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत रामचंद्र माने यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याआधी याच प्रभागातून अपक्ष उमेदवार डॉ. मनोज बामा पाटील यांनीही अर्जुन पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. दोन्ही विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्याने पॅनल ३० (ड) मध्ये शिवसेनेची एकतर्फी निवड झाल्याची माहिती मिळाली आहे.

Kalyan Dombivli municipal election political news
Ambarnath: अंबरनाथमध्ये काँग्रेसला भगदाड, काँग्रेसच्या त्या १२ नगरसेवकांचा मोठा निर्णय

कल्याण डोंबिवलीत महायुतीचा महापौर, खासदार डॉ श्रीकांत शिंदे

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर महायुतीचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास फक्त जनतेलाच नाही तर विरोधकांनाही आहे, असा दावा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला. कल्याण येथे शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. शिंदे म्हणाले की, महायुतीचे २० उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. त्यामुळे लोकांचा विश्वास महायुतीवर अधिक दृढ झाला आहे.

१५ तारखेला मतदान झाल्यानंतर १६ तारखेला निकाल जाहीर होईल आणि त्यावेळी महायुतीचे पैकीच्या पैकी उमेदवार निवडून येतील, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. कल्याण डोंबिवलीत महायुतीचा महापौर असेल, तर उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर बसेल,असे भाकीत त्यांनी यावेळी केले.

Kalyan Dombivli municipal election political news
MMRDA : नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली फक्त १५ मिनिटांत, प्रोजेक्टचं ८० टक्के काम पूर्ण, कधी सुरू होणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com