Andheri East Bypoll: अंधेरीची पोटनिवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता; सागर बंगल्यावरील बैठकत चर्चा

काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर या निवासस्थानी महत्वपुर्ण बैठक पार पडली.
Uddhav Thackeray And Aditya Thackeray
Uddhav Thackeray And Aditya ThackeraySaam TV
Published On

सुशांत सावंत -

मुंबई: राज्याभरात सध्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीवरुन चांगलीच चर्चा सुरु आहे. कालपर्यंत भाजप विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ही लढत होणार असल्याचं स्पष्ट दिसत होतं. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही निवडणूक लढवू नये अशी पत्राद्वारे मागणी केली. (Andheri East Assembly By-Election)

तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील अंधेरी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करु नका, असं आवाहन केलं. त्यामुळे अंधेरीची पोट निवडणूक बिनविरोध होणार की काय अशा चर्चा सुरु असतानाच ही पोटनिवडणुक बिनविरोधच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाहा व्हिडीओ -

कारण काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर या निवासस्थानी महत्वपुर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भाजप उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांचे मत जाणून घेण्यात आले, मुरजी पटेल हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.

मात्र, सध्याची परिस्थिती बघता ही निवडणूक बिनविरोध करत एक वेगळा संदेश देता येईल अशी चर्चा देखील बैठकीत झाल्याची माहिती विश्वनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, दुपारपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray And Aditya Thackeray
'कपटी भावापेक्षा दिलदार शत्रू बरा'; उद्धव ठाकरेंनी पवारांचे आभार मानताच मनसेकडून जहरी टीका

त्यामुळे ज्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे 'शिवसेना' हे नाव आणि चिन्ह ' धनुष्य बाण ' गमवावं लागलं आणि आता मात्र ही निवडणूक बिनविरोध झाली तर आजपर्यंत या निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाकडून केलेले सर्व प्रयत्न वाया जाणार की काय अशा चर्चां भाजपच्या गोटात सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com