'कपटी भावापेक्षा दिलदार शत्रू बरा'; उद्धव ठाकरेंनी पवारांचे आभार मानताच मनसेकडून जहरी टीका

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आवाहन केलं आहे.
Uddhav Thackeray and Raj Thackeray
Uddhav Thackeray and Raj Thackeray Saam TV

मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आवाहन केलं आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) घेतलेल्या याच भूमिकेबद्दल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांचे आभार मानले.

मात्र, शरद पवार यांच्या आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) पत्र लिहित भाजपने ही पोटनिवडणूक लढवू नये अशी विनंती केली होती. तरिही उद्धव ठाकरे यांनी फक्त शरद पवार यांचे आभार मानले पण राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे नाही, याच मुद्यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे.

पाहा व्हिडीओ -

याबाबत त्यांनी एक ट्विट केलं असून त्यांनी ट्विटमध्ये (Tweet) उद्धव ठाकरेंनी पवारांचे आभार मानलेला मजकूर आणि ट्विटमध्ये म्हटलं आहे, राजसाहेब एक म्हण आठवली 'कपटी भावापेक्षा दिलदार शत्रू बरा' असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक भाजपने प्रतिष्ठेची बनवलेली असतानाच मनसे अध्यक्ष यांनी ती भाजपने लढवू नये अशी विनंती करणारे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलं. मात्र, राज ठाकरेंना खूप उशीरा जाग आल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली होती.

दरम्यान, आता खूप उशीर झाल्याचं बोललं जात असतानाच शरद पवार यांनी देखील आज पत्रकार परिषदेमध्ये ही निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं आहे.पवारांनी केलेल्या या आवाहानंतर उद्धव ठाकरेंनी पवारांचे आभार मानले मात्र, राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचा साधा उल्लेख देखील उद्धव ठाकरेंनी केला नसल्यामुळे आता संदीप देशपांडे यांनी ट्विटद्वारे त्यांच्यावर टीका केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com