Farmer Success Story: कांदा पिकावर रोटार मारलं, केली आल्याची शेती, बीडच्या शेतकरी भावांनी घेतलं २५ लाखाचं उत्पादन

Beed Farmer Success Story: बीडच्या दोन तरुण शेतकऱ्यांनी दुष्काळग्रस्त भागात आल्याची शेती केली आहे. त्यांनी जवळपास २५ लाखांचं उत्पादन घेतलं आहे.
Farmer Success Story
Farmer Success StorySaam Tv
Published On

योगेश काशीद, साम टीव्ही प्रतिनिधी

बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा शहरातील सोनवणे वस्ती येथील शिवाजी सोनवणे, गणेश सोनावणे यांनी अदरक म्हणजेच आल्याची शेती केली आहे. गेली दहा महिन्यांपूर्वी अडीच एक्करात 27 किंन्वटल माहिम जातीचे आले या बेणाची 5 फुटाचे बेडवर आलेची लागवड केली. अदरकचं त्यांनी यशस्वी उत्पादनदेखील घेतलं. त्यांचा हा प्रयोग खूप यशस्वी ठरला.

Farmer Success Story
Success Story: MBBS केले, डॉक्टरी सोडून दिली UPSC; दुसऱ्या प्रयत्नात IAS; अपराजिता सिंह यांचा प्रवास

दहा महिन्यांपूर्वी केली होती आल्याची लागवड....

बीडच्या आष्टी तालुका हा दुष्काळी आसताना देखील शिवाजी सोनवणे, व गणेश सोनवणे यांनी अडीच एक्कर शेतात आले या पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. ठिबकच्या साह्याने आलेला पाणी देउन, फवारणी करुण दहा महिन्यातच जैविक पद्धतीने फवारणी करत एका कंदाला जवळपास अडीच किलो पर्यंत आले येत आहे

बीडच्या आष्टी तालुक्यातील दुष्काळी भागात अगदी कमी पाण्यावर यशस्वी प्रयोग करुण दाखवला आहे. या ठिकाणी शेती करताना शेतकऱ्यांना खूप अडचणी येतात. मात्र, या शेतकऱ्यांनी खूप हुशारीने आणि आधुनिक पद्धतीचा वापर केला आणि अदरक पीक घेतले.

Farmer Success Story
Success Story: MBBS केले, डॉक्टरी सोडून दिली UPSC; दुसऱ्या प्रयत्नात IAS; अपराजिता सिंह यांचा प्रवास

२५ लाख कमावले

आल्याची शेतीला संपूर्ण पिक घेण्यासाठी अडीच एकरात फक्त एक लाख पंचाहत्तर हजार रुपये खर्च करून आला असून, त्यामधून 25 लक्ष रूपये उत्पादन झाले आहे.. कांदा पिकाला भावाची शास्वती नसल्याने, युवक शेतकरी गणेश सोनवणे, शिवाजी सोनवणे, यांनी आपल्या अडीच एक्करात कांदा पिकावर लोटर हाकवून, त्यामध्ये आल्याची शेती यशस्वीपणे करुण दाखवली आहे... या सोनवणे कुटूंबातील आल्याची शेती यशस्वी झाल्याने परिसरातील युवक शेतकरी हा शेती पाहण्यासाठी शेतात गर्दी करत आहेत.

Farmer Success Story
Success Story: शेतकऱ्याच्या लेकीची यशाला गवसणी, पहिल्याच प्रयत्नात महसूल सहाय्यक पदावर निवड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com