Success Story: MBBS केले, डॉक्टरी सोडून दिली UPSC; दुसऱ्या प्रयत्नात IAS; अपराजिता सिंह यांचा प्रवास

Success Story of IAS Aparajita Singh: अपराजिता सिंह यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. डॉक्टर सोडून त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता.
Success Story
Success StorySaam Tv
Published On
Summary

IAS अपराजिता सिंह यांचा प्रेरणादायी प्रवास

दुसऱ्या प्रयत्नात पास केली यूपीएससी

डॉक्टर सोडून निवडला सिविल सर्व्हिसचचा पर्याय

प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो. संघर्ष कितीही असला तरी त्यामुळे स्वप्नांना मागे सोडायचे नाही. नेहमी स्वप्नांचा पाठलाग करायचा. असंच काहीसं अपराजिता सिंह यांनी केलं. त्यांनी आपल्या स्वप्नांसाठी स्वतःचा मार्ग स्वतः शोधला. त्यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. त्यांनी एमबीबीएस पदवी प्राप्त केल्यानंतरही आयएएस होण्याचा निर्णय घेतला. पहिल्या प्रयत्नात अपयश मिळाल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले.

Success Story
Success Story: लहानपणीचं स्वप्न पूर्ण, दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS केशव कुमार चौधरी यांचा प्रेरणादायी प्रवास

अपराजिता यांचा जन्म डॉक्टर कुटुंबात झाला. त्यांचे आईवडिल आणि दोन्ही भाऊ मेडिकल क्षेत्रात कार्यरत आहेत. या परिस्थितीत डॉक्टर होणे हे त्यांच्यासाठी सोपे होते. परंतु त्यांनी सिविल सर्व्हिसमध्ये जॉइन होण्याचा निर्णय घेतला.

अपराजिता या हरियाणातील रोहतक येथे आजी बाबांसोबत राहिल्या होत्या. त्यांनी पोस्ट ग्रेजुएट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधून एमबीबीएस पदवी प्राप्त केली. त्यांच्या कुटुंबात पहिल्यापासूनच अभ्यासाचे वातावरण होते. त्यांनी शाळेत असताना खूप अडचणींचा सामना करावा लागला.

मेडिकलचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी डॉक्टरची प्रॅक्टिस सुरु केली. ८ तासांची नोकरी करत त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी डॉक्टर सोडून यूपीएससी परीक्षा दिली. २०१७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा परीक्षा दिली. त्यात त्यांना अपयश मिळाले.

Success Story
Success Story: १०वी-१२वीत टॉपर; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; IFS आदिती यांचा प्रेरणादायी प्रवास

२०१८ मध्ये अपराजिता यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी ८२वी रँक प्राप्त केली.त्यांची मेहनत आणि सातत्यामुळे त्यांनी यश मिळवले. त्यांच्या या यशामुळे सर्वांनाच प्रेरणा मिळते.

Success Story
MPSC Success Story: एमपीएससी परीक्षेत सोलापूरचा डंका; ४ तरुणांची उपजिल्हाधिकारी पदावर वर्णी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com