

आयपीएस केशव कुमार यांचा प्रेरणादायी प्रवास
दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी क्रॅक
लहानपणीचे स्वप्न केले पूर्ण
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा सर्वात अवघड असते. ही परीक्षा देऊन आयपीएस आणि आयएएस होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. या परीक्षेत अनेकदा अपयश येते. परंतु कितीही अपयश आले तरीही हार मानायची नसते. दरम्यान, अनेकजण पहिल्या प्रयत्नात यशस्वी होतात. असंच काहीसं केशव कुमार यांनी केलं. त्यांनी दुसऱ्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांचा प्रवास हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
केशव कुमार चौधरी हे मूळचे बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९८१ रोजी झाला. त्यांचे वडील जिल्हा कलेक्टर म्हणून कार्यरत होते. कुटुंबात लहानपणापासूनच अभ्यासाचे धडे मिळत होते. त्यांनी शाळेत असतानाच सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांना आयएएस किंवा आयपीएस व्हायचे होते.
केशव कुमार चौधरी यांनी दिल्ली विद्यापीठातून इतिहास, पॉलिटिकल सायन्स आणि हिंदी विषयात ग्रॅज्युएशन केले. यूपीएससीची तयारी करुन त्यांनी पहिल्याच प्रयत्नात मेन्सपर्यंत बाजी मारली होती. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा दिली. २००९ मध्ये त्यांनी १३७ रँक प्राप्त केली.त्यांनी आयपीएस पदवी प्राप्त केली.
केशव कुमार चौधरी यांनी अनेक ठिकाणी काम केले आहे. त्यांना २०१३ मध्ये सीनियर ग्रेड प्रमोशन मिळाले. यानंतर १ जानेवारी २०२३ रोजी डीआयजीवर पदोन्नती केली आहे. यानंतर त्यांना २०२४ मध्ये डीजीपी गोल्ड जेस्क मेडलने सन्मानित केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.