

IPS नविता कुमार यांचा प्रेरणादायी प्रवास
नोकरी करत केला यूपीएससीचा अभ्यास
पाचव्या प्रयत्नात यूपीएससी क्रॅक
मेहनतीच्या जोरावर तुम्ही कोणतेही यश मिळवू शकतात. फक्त मेहनत आणि सातत्य या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात.असंच काहीसं आयपीएस नविता कुमार यांनी केलं. त्यांनी सुरुवातीला प्रायव्हेट नोकरी केली. १० ते ६ नोकरी केल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी जवळपास १० वर्ष नोकरी केली. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरु केला. त्यांचे प्रयत्न, सातत्य यामुळे त्यांना यश मिळाले.
नविता कुमार यांनी २०१३ मध्ये HBTU कानपुरमदून केमिकल इंजिनियरिंग केले. त्यानंतर त्यांना चांगली नोकरी मिळाली. सर्वकाही व्यवस्थित सुरु होते. परंतु त्यांचे सिव्हिल सर्व्हिसचे स्वप्न अर्धवट राहिले होते. त्यामुळे त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
८ ते ९ तासांची नोकरी करत यूपीएससी परीक्षा देणे सोपे नव्हते. नोकरी करताना ५ वर्ष झाली. त्यांचे अभ्यासाशी नाते तुटले होते. परंतु तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी परीक्षा देण्याचा निर्धार केला. त्यांनी नोकरी करता करता अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. सकाळी ४ वाजता उठून त्या अभ्यास करायच्या. ऑफिसमधून येता-जाताना वेळ मिळायचा तेव्हा त्या अभ्यास करायच्या.
पाचव्या प्रयत्नात यूपीएससी क्रॅक
लग्नानंतर नविता यांनी सासरच्या लोकांकडून खूप सपोर्ट मिळाला. त्यांनी प्रायव्हेट नोकरीसोबत यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु ठेवली. २०१८ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्यास सुरुवात केली. २०१८,२०१९, २०२० आणि २०२१ सलग ४वेळा त्यांना यूपीएससी परीक्षेत अपयश मिळाले. परंतु तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पाचव्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. नविता यांनी २५१ रँक प्राप्त केली. त्या आयपीएस अधिकारी झाल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.