

रवि कुमार सौनी यांचा प्रेरणादायी प्रवास
१०वीत असताना KBC मध्ये जिंकले होते १ कोटी
एमबीबीएस केले नंतर यूपीएससी केली क्रॅक
यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. तुम्हाला यश मेहनतीने आणि सातत्याने मिळवायचे असते. त्यासाठी खूप मेहनत करायची असते. असंच काहीसं रवि कुमार सैनी यांनी केलं. त्यांनी डॉक्टर झाल्यानंतर यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रवि कुमार यांनी लहानपणी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात १ कोटी रुपये जिंकले होते. त्यांनी पुढे जाऊन एमबीबीएस करण्याचा निर्णय घेतला आणि नंतर यूपीएससी परीक्षा दिली.
लहान असताना रवि अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी १५ प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली होती. रवि लहानपणापासूनच खूप हुशार होते. त्यांनी मोठ्या जिद्दीने एमबीबीएस केले त्यानंतर यूपीएससी परीक्षा दिली.
रवि मोहन सैनी हे मूळचे राजस्थानचे रहिवासी आहेत. ते लहानपणापासूनच खूप हुशार होते. ते १०वीत असताना कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी १२वीनंतर मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर महात्मा गांधी कॉलेजमधून एमबीबीएस केले. एमबीबीएस केल्यानंतर त्यांनी डॉक्टर क्षेत्रात काम न करण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांनी सिविल सेवा परीक्षेची तयारी केली.
रवि मोहन सैनी यांनी शालेय शिक्षण जयपूरमधून केले. यानंतर एमबीबीएस केले. इंटर्नशिप करतानाच त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. स्वतः च्या मेहनतीने त्यांनी परीक्षा पास केली. रवि मोहन सैनी यांचे वडील नौदलात होते. त्यांनी वडिलांकडूनच प्रेरणा घेऊन पोलिस फोर्स जॉइन करण्याचा निर्णय घेतला.
रवि मोहन सैनी यांनी २०१४ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. यावेळी त्यांनी तीनदा यूपीएससी परीक्षा दिली होती. पहिल्यांदा २०१२ मध्ये परीक्षा दिली. २०१३ मध्ये त्यांनी परत दुसऱ्यांदा परीक्षा दिली. यावेळी त्यांची डाक विभागात निवड झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.