Success story: कॉलेज ड्रॉप आउट, १८ व्या वर्षी सुरु केला बिझनेस; दोन वर्षात ५.२८ कोटींची कमाई

Success Story of 18 Year Old Businesswomen: लुधियानाच्यावंशिका मित्तलने वयाच्या १८ व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरु केला. यासाठी तिने कॉलेज सोडले. आज तिने ४ कोटींची कमाई केली आहे.
Success story
Success storySaam tv
Published On
Summary

१८ व्या वर्षी झाली बिझनेसवुमन

वंशिका मित्तलने सुरु केला स्वतःचा व्यवसाय

४ कोटींची केली कमाई

आयुष्यात अनेकदा अपयश येते. परंतु अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात. एक उत्तम संधी तुम्हाला खूप यशस्वी बनवते. त्यासाठी एक पाऊल उचलावे लागते. असंच काहीसं १८ वर्षीय वंशिका मित्तलने केल. तिने वयाच्या १८ व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरु केला.

Success story
Success Story: सातवी पास, पुण्यातील ७० वर्षीय आजींचा वडापावचा व्यवसाय; जमीन अन् तीन मजली घर केले खरेदी

वंशिका मित्तलने २०२४ मध्ये फ्लोरियल बिझनेसची सुरुवात केली आहे. प्लोरियल हा एक गिफ्टिंग ब्रँड आहे. यामध्ये अनेक क्रोशियो फुलांचे पुष्पगुच्छ, गिफ्ट्सचे प्रोडक्ट्स आहेत. या गिफ्ट्सच्या वस्तू ऑनलाइन पद्धतीने विकते. यातून ती लाखो रुपये कमवत आहे.

वंशिका मित्तलने हे गिफ्ट्सचे प्रोडक्ट्स ब्लिंकिट किंवा इतर वेबसाइटवरुन विकत येतात.दोन वर्षात ५.२८ कोटी रुपयांचा बिझनेस उभारला आहे.

वंशिकाचा जन्म बिझनेसमॅन कुटुंबात झाला. त्यांचे वडील वीजा कंसल्टंसी चालवतात.हे काम बघूनच वंशिका मोठी झाली. तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर पटियाला येथील थापर युनिव्हर्सिटीमधून त्यांना कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनियरिंग करण्याची ऑफर मिळाली होती. परंतु तिच्या गावी फार चांगले कॉलेज नसल्याने त्यांनी लुधियानामधीलच अरबिंदो कॉलेजमध्ये बीबीएसाठी अॅडमिशन घेतले.

वंशिका घरीच आपल्या आजीला स्वेटर, टेबल मॅट विणताना पाहायची. तिला लहानपणापासूनच याबाबत उत्सुकता होती. त्यानंतर कॉलेजमधील एका मित्राला तिने क्रोशियो बनवून दिला. तिने आपला पहिला पुष्पगुच्छ ८०० रुपयांना विकला.

Success story
Success Story: मल्टी नॅशनल कंपनीतील नोकरी सोडली, UPSC परीक्षेची तयारी केली, तिसऱ्या प्रयत्नात मिळवले यश; IAS अभिषेक शर्मा यांचा प्रवास

२०२४ मध्ये वंशिकाने आपला बिझनेस सुरु केला. १८ व्या वर्षी तिने स्वतःचा बिझनेस सुरु करुन त्यावर काम केले. या कामामुळे त्यांना कॉलेजला जाता येत नव्हते. कॉलेजमध्ये ७५ टक्के अटेंडंस अनिवार्य होती. मात्र, तिला ते जमत नव्हते. त्यामुळे तिने कॉलेज सोडले आणि फुल टाईम बिझनेसवर लक्ष दिले.

वंशिका मित्तलचा फ्लोरियर लुधियाना ब्रँड खूप प्रसिद्ध आहे. तिने आपल्या ब्रँडमधून पहिल्या वर्षी १.२८ कोटी रुपये कमावले. दुसऱ्या वर्षी ४ कोटींपर्यंतची कमाई केली. या वर्षी ६-७ रुपयांपर्यंत कमाई करण्याची अपेक्षा आहे.

Success story
Success Story: ४०वेळा फेल, १२ वर्षांच्या मेहनतीनंतर स्वप्न सत्यात उतरले; शेतकऱ्याचा लेक झाला सरकारी अधिकारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com