Crime: मौलवीकडून १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, पीडितेने दिला बाळाला जन्म

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये १४ वर्षांच्या मुलीवर मौलवीने बलात्कार केला. पीडित मुलगी गरोदर राहिली असू तिने बाळाला जन्म दिला. आरोपी मौलवीला पोलिसांनी अटक केली.
Crime: मौलवीकडून १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, पीडितेने दिला बाळाला जन्म
Uttar Pradesh CrimeSaam Tv
Published On

Summary:

  • उत्तर प्रदेशमध्ये बलात्काराची भयंकर घटना समोर आली आहे

  • १४ वर्षांच्या मुलीवर मौलवीने बलात्कार केला

  • पीडित मुलगी गरोदर राहिली असून तिने बाळाला जन्म दिला

  • आरोपी मौलवीला पोलिसांनी अटक केली

उत्तर प्रदेशच्या हापुडमध्ये १४ वर्षांच्या मुलीवर मौलवीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. पीडित मुलीने बाळाला जन्म दिला. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मौलवीला अटक केली. शेजारी राहणारी अल्वयीन मुलगी घरामध्ये एकटी असल्याचा फायदा आरोपी मौलवीने घेतला. त्याने पीडित मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला.

या घटनेनंतर पीडित मुलगी गरोदर राहिली. १४ फेब्रुवारीला पीडित मुलीच्या पोटात दुखत होते त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले. ज्याठिकाणी ती गरदोर असल्याचे कळाले. घरी आल्यानंतर काही तासांतच पीडित मुलीने बाळाला जन्म दिला. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मौलवीविरोधात १७ फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली.

Crime: मौलवीकडून १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, पीडितेने दिला बाळाला जन्म
Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

पीडित मुलीचे कुटुंबीय मूळचे अमरोहा येथे राहणारे आहे. ते हापुड येथे मजुरीचे काम करतात. पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, १४ फेब्रुवारीच्या रात्री आठ वाजता मुलीच्या पोटात दुखायला लागले. मुलीला प्रचंड वेदना होत होत्या. तिला नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी मुलीची तपासणी करून ती गरोदर असल्याचे सांगितले. मुलगी गरोदर असल्याचे सांगितल्यामुळे कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. ते मुलीला घेऊन घरी गेले. घरी आल्यानंतर मुलीने बाळाला जन्म दिला. मुलीची विचारपूस केली असता तिने मौलवीने केलेल्या घाणेरड्या कृत्याबद्दल सांगितले.

Crime: मौलवीकडून १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, पीडितेने दिला बाळाला जन्म
Dhule Crime : लग्नसोहळ्यात रक्तरंजित थरार! ८ जणांवर चाकूने सपासप वार, तिघांचा जागीच मृत्यू

पोलिसांनी सांगितले की, शेजारी राहणाऱ्या मौलवीने मुलीसोबत हे भयंकर कृत्य केले. मुलगी घरात एकटी असताना मौलवी त्याठिकाणी यायचा आणि तिच्यावर बलात्कार करायचा. आरोपीने पीडित मुलीला अशापद्धतीने धमकावले होते की तिने घाबरून कुटुंबीयांना देखील या घटनेबद्दल सांगितले नाही. पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना तिच्या शारीरिक स्थितीबद्दल देखील कळाले नाही.

Crime: मौलवीकडून १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, पीडितेने दिला बाळाला जन्म
Crime: सामूहिक बलात्कारानंतर महिलेची हत्या, शेतामध्ये नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

मौलवीने शेजारी राहणाऱ्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत हे घाणेरडं कृत्य केले. पोलिसांनी पीडित मुलगी आणि तिच्या बाळाला वन स्टॉप सेंटरला पाठवले. दोघांची प्रकृती चांगली आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर या प्रकरणी पोलिस ठाण्यात मौलवीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. १८ फेब्रुवारीला आरोपी मौलवी इस्लामला अटक करण्यात आली. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Crime: मौलवीकडून १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, पीडितेने दिला बाळाला जन्म
Yavtmal Crime : दोस्त दोस्त ना रहा! संतापलेल्या मित्रानेच जिवाभावाच्या मित्राची केली हत्या, यवतमाळ हादरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com