4 महिन्यांपूर्वी लग्न, व्हॅलेंटाईनडेच्या दिवशीच CA नवऱ्याने गरोदर बायकोचा कात्रीने गळा चिरला

CA Husband Kills Pregnant Wife In Gurugram On Valentine’s Day: व्हॅलेंटाईन डेच्या दुसऱ्याच दिवशी हरियाणामध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली. चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या सीए नवऱ्याने गरोदर पत्नीची हत्या करून चोरीचा बनाव केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
Police investigation underway after a chartered accountant allegedly murdered his pregnant wife and staged a robbery in Gurugram, Haryana
Police investigation underway after a chartered accountant allegedly murdered his pregnant wife and staged a robbery in Gurugram, HaryanaSaam Tv
Published On

हरियाणामध्ये एक भयानक हत्याकांडाची घटना घडली आहे. व्हॅलेंटाईनडेच्या दुसऱ्या दिवशी एका सीएने आपल्या बायकोचा खून केला आहे. या सीएचे नाव अंशुल धवन आहे. चार महिन्यापूर्वीच अंशुलचे मेहक कथुरियाशी लग्नगाठ बांधली होती. मेहक एचडीएफसी बँकेत काम करत होती आणि ती गरोदर होती. अंशुलने तिचा गळा चिरून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने पोलिसांना फोन करून सांगितले की चोरी झाली आणि चोरांनी त्याच्या बायकोची हत्या केली.

Police investigation underway after a chartered accountant allegedly murdered his pregnant wife and staged a robbery in Gurugram, Haryana
पुण्यातील संतापजनक घटना! लॉजवर न्यायचं होतं, पण डोंगरवर नेलं; देहविक्री करणाऱ्या महिलेसोबत ६ जणांचं भयंकर कृत्य

अंशुल आणि मेहकचे यांचे लग्न 25 सप्टेंबर 2025 रोजी झाले होते. मेहक गुरुग्राममधील एचडीएफसी बँकेत काम करत होती. तर तिचा नवरा ही तिथेच काम करत होता. या दोघांमध्ये सातत्याने भांडण सुरू राहायची. अंशुलला नेहमीच तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. ज्यामुळे त्या दोघांमध्ये सतत वाद होत असायचे. व्हॅलेंटाईनडेच्या दुसऱ्याच दिवशी रात्री 11 वाजता अंशुलने पोलिसांना फोन करून सांगितले की आमच्या घरात चोर शिरले आणि त्यांनी घरात मोठ्या प्रमाणात चोरी केली आणि माझ्या बायकोचा गळा कापला. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. या दरम्यान त्याच्याकडून माहिती घेत असताना पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी खाकीचा धाक दाखवल्यानंतर त्याने स्वतःच गुन्हा कबूल केला.

Police investigation underway after a chartered accountant allegedly murdered his pregnant wife and staged a robbery in Gurugram, Haryana
Pune : पुणे पोलिसांची बुधवार पेठेत धाड, ११ बांगलादेशी महिलांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंशुलला बायकोच्या चारित्र्यावर बऱ्याच काळापासून शंका होती, ज्यामुळे त्यांच्यात वारंवार भांडणे होत असत. या संशयामुळे अंशुलने तिची हत्या केली. हत्येदरम्यान अंशुलने बोटांचे ठसे राहू नयेत म्हणून सर्जिकल ग्लोव्हज घातले होते. त्याने पहिल्यांदा मेहकचा गळा दाबून बेशुद्ध केले आणि नंतर कात्रीने तिचा गळा कापला. या संपूर्ण प्रकरणानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नराधम नवऱ्याला अटक केली असून त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी तिच्या कुटुंबियाने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com