पुण्यातील संतापजनक घटना! लॉजवर न्यायचं होतं, पण डोंगरवर नेलं; देहविक्री करणाऱ्या महिलेसोबत ६ जणांचं भयंकर कृत्य

Pune Crime News : पुण्यात ४० वर्षीय देहविक्री करणाऱ्या महिलेची हत्या करण्यात आली. याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam tv
Published On
Summary
  • पुण्यात ४० वर्षीय महिलेचा सहा जणांनी खून केला

  • मृतदेह मांगडेवाडी येथील खाणीत फेकण्यात आला

  • सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी अटकेत

  • पोलिस आयुक्तांचा मोठा खुलासा

  • पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे

पुण्यात एका ४० वर्षीय महिलेचा ६ जणांनी मिळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. शफिया सलीम शेख (वय ४०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ६ जणांनी मिळून तिला मारहाण करत कोणाला संशय येऊ नये म्हणून तिचा मृतदेह खाणीत फेकून दिला. १० फेब्रुवारी रोजी मांगडेवाडी येथील एका खाणीत तिचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेने यातील सर्व आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, शफिया ही महिला देहविक्रीचा व्यवसाय करत होती. ८ फेब्रुवारी रात्री ती कोंढवा भागातील कान्हा चौकात मद्यधुंद अवस्थेत उभी होती. त्यावेळी आरोपी केशव कमलेश चौधरी (२०), सोन्या लक्ष्मण पवार (१८) आणि अब्दुल मोहम्मद शेख (२३) यांनी तिला पाहिले. तिघांनी तिला कात्रज येथील एका लॉजवर घेऊन जायचं ठरवले. मात्र तिथे न जाता तिला मांगडेवाडी येथील एका खाणीजवळील डोंगरावर नेले. त्यानंतर काही वेळातच इतर आरोपी महादेव अर्जुन व्होरडे (४०), साई अमित पुजारी (१९) आणि सोहेल हनीफ खान (२०) तेथे पोहोचले.

Pune Crime News
Pune : पुणे पोलिसांची बुधवार पेठेत धाड, ११ बांगलादेशी महिलांना अटक

शाफिया आणि आरोपी डोंगरावर मद्यपान करत असताना शफिया यांनी आपल्याला लॉजवर न नेता डोंगरावर का आणले, असा प्रश्न विचारला. यावरून त्यांच्यात वाद झाले. आरोपींनी रागाच्या भरात तिला मारहाण करायला सुरुवात केली. यामध्ये तिचा मृत्यू झाला. या सर्वांनी मृतदेह घेऊन तिथे असलेल्या ५० ते ५५ फूट खोल असलेल्या खाणीत फेकून दिला.

१० फेब्रुवारी रोजी खाणीत महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिस आणि गुन्हे शाखेकडून तपास सुरू केला होता. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आपण हे कृत्य केल्याची कबुली आरोपींनी दिली. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल आहे. पुढील तपास सुरू आहे.

Pune Crime News
Maharashtra Politics : महापौर निवडणुकीआधी भिवंडीत मोठी घडामोड, भाजपच्या नाराज नगरसेवकांना शिवसेनेकडून फोडण्याचे प्रयत्न

या घटनेवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हणाले, "कोणत्याही प्रकारची सामूहिक बलात्काराची घटना नाही. एक मृतदेह सापडला होता, देहविक्री करणारी महिला त्यांच्यासोबत गेल्याचे दिसून आलेले आहे. ६ आरोपी आमच्या ताब्यात आहेत बलात्काराची कुठलीही घटना समोर आलेली नाही. हा फक्त खुनाचा गुन्हा आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com