Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघाताचा संशय; सुनेत्रा पवारांकडून CBI चौकशीची मागणी

Sunetra Pawar Demands CBI Probe Into Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय अधिकच वाढला असून सुनेत्रा पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या वृत्तानंतर आमदार रोहित पवार यांनी एक वेगळाच संशय उपस्थित केली आहे.
Sunetra Pawar Demands CBI Probe Into Ajit Pawar Plane Crash :
Suspicions deepen over Ajit Pawar’s plane crash near Baramati as Sunetra Pawar demands a CBI inquirsaam tv
Published On
Summary
  • अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत घातपाताचा संशय

  • ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती, चौकशीवर प्रश्नचिन्ह

  • सुनेत्रा पवार यांची सीबीआय चौकशीची मागणी

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी संशय व्यक्त केला जातोय. विमान दुर्घटना कशी घडली याचा उलगडा ब्लॅक बॉक्समधून होईल असं म्हटलं जात होतं. मात्र आता ब्लॅक बॉक्स जळला असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे अजित पवार यांचा अपघात नसून तो घातपात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी केला आहे. आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली आहे.

आज सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. बारामती विमानतळाजवळ अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. यात अजित पवारांसह इतर ५ जणांचा मृत्यू झाला. दम्यान या अपघाताकडे घातपाताच्या नजरेनं पाहिलं जातंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आणि रोहित पवार यांनी अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केलाय. त्याच दरम्यान सुनेत्रा पवार यांनी विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्यात, यावी अशी मागणी केली आहे.

Sunetra Pawar Demands CBI Probe Into Ajit Pawar Plane Crash :
Ajit Pawar Plane Crash: विमानातून उडी मारण्याची धडपड कुणीतरी करत होतं पण....; अपघाताप्रकरणी नवी माहिती आली समोर

अजित पवार यांच्या अपघाताची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यांना या मागणीचे निवेदनही दिले. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच पार्थ पवार उपस्थित होते. अपघाताच्या घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी. सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी, यासाठी प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची मागणी शिष्टमंडळाने केली आहे.

Sunetra Pawar Demands CBI Probe Into Ajit Pawar Plane Crash :
'भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलमुळे अजितदादांचा घात'; विमान पडलं की पाडलं? संजय राऊतांना संशय

दरम्यान आमदार रोहित पवार यांनी अपघाताचा तपास संथ गती होत असल्याने त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच विमानाचे संचालक असलेल्या दिल्लीस्थित व्हीएसआर व्हेंचर्सकडून निष्काळजीपणा आणि नियामक अपयशाचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांनी ऑपरेशनल आणि क्रू अनियमिततेबद्दल चिंता व्यक्त करत पुराव्याची छेडछाड केली जाऊ शकते, असाही संशय रोहित पवार यांनी व्यक्त केलाय.

अपघाताला २० दिवस उलटून गेले आहेत तरीही तपासाला गती मिळालेली नाहीये. हे दुर्दैवी असल्याचं त्यांनी एक्सवर पोस्टकरून म्हटलंय. दरम्यान तपासातील विलंब हा व्हीएसआर कंपनीला पुरावे नष्ट करण्याचा संधी देण्यासाठी केला जात आहे का? कंपनीला कोणाचे तरी संरक्षण आहे का? ब्लॅक बॉक्स खराब झाल्याचं सांगितलं जात आहे. ही भीती मी पाच दिवसांपूर्वी व्यक्त केली होती, ती शक्यता खरी ठरतेय, असं त्यांनी म्हटलंय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com