Shiv Sena MP Sanjay Raut has sparked a political storm by alleging that Ajit Pawar
Shiv Sena MP Sanjay Raut has sparked a political storm by alleging that Ajit Pawar

'भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलमुळे अजितदादांचा घात'; विमान पडलं की पाडलं? संजय राऊतांना संशय

Sanjay Raut Suspicion Over Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमान अपघातावरून आता चांगलच राजकारण तापलयं. खासदार संजय राऊतांनी दादांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल असल्याचं सांगत नवा संशय व्यक्त केलाय. राज्यसभेतल्या राऊतांच्या दाव्यावरुन राज्याच्या राजकारणा खळबळ उडाली आहे. पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्टमधून.
Published on
Summary
  • अजित पवारांच्या विमान अपघातावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू.

  • संजय राऊतांनी भाजपच्या भ्रष्टाचार फाईलचा उल्लेख करत घातपाताचा संशय व्यक्त केला.

  • राज्यसभेत राऊतांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं.

अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल शंकांचं काहूर माजलंय. दुसरीकडे संजय राऊतांनी तर थेट भाजपचं नाव घेत दादांच्या अपघातामागे षडयंत्र असल्याचा खळबळजनक आरोप केलाय. भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलमुळेच दादांचा घात झालाय का? असा सवाल राऊतांनी केलाय..एवढंच नाही तर बॉडी जळून खाक झाल्या मग कागद न जळण्यावरही राऊतांनी सवाल उपस्थित केलाय.

तर या प्रकरणी राऊतांनी थेट आंतरराष्ट्रीय कोर्टात पुरावे द्यावेत, असा पलटवार भाजपनं केलाय. फक्त राऊतच नव्हे तर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी तर थेट व्हिजिबिलिटी कमी असल्याच्या कारणावरच प्रश्न उपस्थित केलाय. यात विरोधकच नाही तर सत्ताधारी आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही धुक्यामुळे नाही तर धोक्यामुळे दादांचा मृत्यू झाल्याचं म्हटलंय.. तर शंकांचं निरसन करण्यासाठी चौकशी करण्याचं आश्वासन गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलंय.

Shiv Sena MP Sanjay Raut has sparked a political storm by alleging that Ajit Pawar
Maharashtra Politics: अजितदादांचा पक्ष अमित शहांचा गुलाम झालाय, संजय राऊतांचं मोठं विधान

खरंतर 1995 ते 1999 दरम्यान पुरंदर उपसा सिंचन योजनेची किंमत जाणीवपूर्वक वाढवल्याचा आरोप अजित पवारांनी भाजपवर केला होता. एवढंच नाही तर त्याची फाईल आपल्याकडे असल्याचं म्हटलं होतं. आता त्याच फाईलचा संदर्भ देत राऊतांनी थेट भाजपला घेरलंय.. त्यामुळे संशयाची सुई दूर करण्यासाठी भाजप स्वतःहून अजित पवारांच्या अपघाताच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देणार का? आणि या प्रकरणातील सत्य महाराष्ट्राच्या समोर आणणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com