Maharashtra Politics: अजितदादांचा पक्ष अमित शहांचा गुलाम झालाय, संजय राऊतांचं मोठं विधान

Sanjay Raut On Ajit Pawars Party: संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. 'अजितदादांचा पक्ष अमित शहांचा गुलाम झालाय.', असं विधान त्यांनी केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता अजित पवार यांच्या विमान अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अजित पवार हे स्वगृही परत जाणार होते अशी चर्चा ते गेल्यापासून सुरू आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांचा पक्ष हा अमित शहांचा १०० टक्के गुलाम झालेला पक्ष असल्याचे विधान केले आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'देवेंद्र फडणवीसांसोबत प्रत्येक गोष्टीची चर्चा होते असे नाही. अजित पवार हे स्वत: त्या पक्षाचे प्रमुख होते ना. ते त्यांच्या मर्जीने भाजपसोबत गेले. त्यांना असे वाटले की भाजप पक्ष आपल्या महाराष्ट्राच्या विचाराचा पक्ष नाही. अजित पवार फडणवीसांसोबत खासगीत बरंच काही बोलायचे असं आम्ही बोललो तर. जर फडणवीस यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली नसेल याचा अर्थ त्यांचा फडणवीस यांच्यावर विश्वास नसेल. जर त्यांनी आपल्या स्वगृही परत जायचे असेल तर त्यांनी फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्याची गरज काय. फडणवीसांचा पक्ष हा अखंड महाराष्ट्राच्या विरोधात आहे. फडणवीसांचा पक्ष मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याच्या बाजूने आहे. अशावेळी अजित पवारांसारखा नेता या भूमिकेवर काम करू शकणार नाही हे आम्हाला माहिती आहे. अजित पवारांसोबत आमच्याही चर्चा होत होत्या. फडणवीसांनी आत्मचिंतन करावे की त्यांनी याविषयावर आमच्याशी चर्चा का नाही केली. अजित पवार हे मूळ प्रवाहात येण्याच्या विचाराशी ठाम होते. दोन्ही पक्षामध्ये त्यासंदर्भातील हालचाली सुरू होत्या हे सर्वांना माहिती होते. आज दादा नाही त्यामुळे त्यांच्या नावावर बिल फाडू नये. अजित पवारांचा पक्ष अमित शहांचा १०० टक्के गुलाम झालेला पक्ष आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com