

बिहारच्या नवादा जिल्ह्यात सामूहिक बलात्कारानंतर महिलेची निर्घृण हत्या
मृतदेह शेतामध्ये नग्नावस्थेत आढळल्याने गावात खळबळ
पोलिसांनी २४ तासांत तीन आरोपींना अटक केली
एक आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले
बिहारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. बिहारच्या नवादा जिल्ह्यातील रोह पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. नग्नावस्थेत या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली. महिलेच्या मृतदेहाची अवस्था पाहून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. शवविच्छेदन अहवालातून या महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला वेग आणत अवघ्या २४ तासांच्या आत आरोपीला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ जणांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. आरोपी ऐवढ्यावर थांबले नाहीत त्यांनी या महिलेची निर्घृण हत्या केली. बलात्कारानंतर महिलेच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली त्यानंतर आरोपींनी साडीने गळा आवळून तिची हत्या केली. महिलेच्या हत्येमुळे गावात खळबळ उडाली होती. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक केली. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेली महिला आणि आरोपी दिलीप यादव यांच्यामध्ये जुने भांडण होते. या दोघांमध्ये गोठ्याला पाणी देण्यावरून आणि गुरांना चारा देण्यावरून वाद झाला होता. यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचा. १६ फेब्रुवारीला संध्याकाळी महिला तिच्या मुलांसह शेतामध्ये पाणी देण्यासाठी गेली होती. रात्री उशिरा महिलेने आपल्या दोन्ही मुलांना गुरांना चारा देण्यासाठी घरी पाठवले. ती शेतामध्ये एकटीच होती. याचाच फायदा घेत आरोपी त्याठिकाणी आले आणि त्यांनी तिच्यासोबत भयंकर कृत्य केले.
३ आरोपींनी महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर घटनास्थळापासून ३०० मीटर अंतरावर तिला नेले आणि डोक्यावर लाकडी दांडक्याने वार केले. ऐवढ्यावर न थांबता आरोपींनी साडीने महिलेचा गळा आवळला. मृतदेह त्याचठिकाणी सोडून आरोपींनी पळ काढला. महिलेचा मृतदेह नग्नावस्थेत आढळल्यामुळे गावात खळबळ उडाली. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्हा कबुल केला. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.