Mumbai : देवघरातील मूर्तींसह पूजेचे साहित्य चोरीला, मुंबई पोलिसांनी नोकराचा केला भंडाफोड, अशी केली अटक

Mumbai Crime News : मुंबईत घरकाम करणाऱ्या नोकराने देवघरातील सुमारे चार लाख रुपयांच्या चांदीच्या मूर्ती आणि पूजेचे साहित्य चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. नोकराला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
Mumbai : देवघरातील मूर्तींसह पूजेचे साहित्य चोरीला, मुंबई पोलिसांनी नोकराचा केला भंडाफोड, अशी केली अटक
Mumbai Crime NewsSaam tv
Published On
Summary
  • सांताक्रूझमध्ये घरातील नोकराकडून देवघरातील चोरी

  • सुमारे ₹४ लाखांचा चांदीचा मुद्देमाल लंपास

  • आरोपी महिनाभर फरार होता

  • पोलिसांनी तांत्रिक तपासातून आरोपीला अटक केली

संजय गडदे, मुंबई

मुंबईतील सांताक्रूझ परिसरातील एका घरातून देवघरातील चांदीच्या मूर्ती आणि पूजेचे साहित्य चोरी करण्यात आल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे ही चोरी घरात काम करणाऱ्या एका नोकराने केली असल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी घरातील नोकराला अटक केली असून आरोपीचे नाव शिवरंजन जगलाल असे आहे. तो चोरीनंतर फरार झाला होता. जवळपास महिनाभराच्या शोधानंतर पोलिसांनी त्याला गजाआड केले.

तक्रारदार श्रीय कोडिया या आपल्या पती निपुण आणि मुलगी श्रेणिका यांच्यासह सांताक्रूझ येथील जुहू-कोळीवाडा परिसरातील विश्रांती अपार्टमेंटमध्ये राहतात. 2023 पासून शिकुमार नावाचा नोकर त्यांच्या घरी काम करत होता. नोव्हेंबर 2025 मध्ये त्याने नोकरी सोडल्यानंतर त्याच्या शिफारशीवरून शिवरंजन याला कामावर ठेवण्यात आले होते.

Mumbai : देवघरातील मूर्तींसह पूजेचे साहित्य चोरीला, मुंबई पोलिसांनी नोकराचा केला भंडाफोड, अशी केली अटक
Amravati Robbery News : फिल्मीस्टाइल दरोडा! सोनाराला खाली पाडलं, अंदाजे दीड कोटींचं 800 ग्रॅम सोनं, लाखोंची कॅश लुटली

10 जानेवारी रोजी सकाळी श्रीय उठल्यानंतर शिवरंजन घरात दिसला नाही. संशय आल्याने त्यांनी देवघर तपासले असता चांदीच्या सर्व देवमूर्ती व पूजेचे साहित्य चोरीस गेल्याचे आढळले. चोरीत मोठी व लहान आकाराच्या चांदीच्या दोन थाळ्या, चार वाट्या, तीन पळ्या, एक कलश, घंटा, त्रिशूल, गणेश, लक्ष्मी, कार्तिकेय यांच्या मूर्ती असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता.

Mumbai : देवघरातील मूर्तींसह पूजेचे साहित्य चोरीला, मुंबई पोलिसांनी नोकराचा केला भंडाफोड, अशी केली अटक
Maharashtra Politics : लोकसभा निवडणूक कल्याणमध्ये येऊन लढा; खासदार श्रीकांत शिंदे यांचं गणेश नाईक यांना खुलं आव्हान

या प्रकरणी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आरोपी फरार असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढून अटक केली. बांद्रा येथील न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com