किरकोळ वादातून मित्राने मित्राची हत्या केली
पेट्रोलपंपाजवळ धारदार शस्त्राने हल्ला
आरोपीला पोलिसांनी तातडीने अटक केली
हत्येमागील कारणांचा सखोल तपास सुरू
संजय राठोड, यवतमाळ
यवतमाळमध्ये मैत्रीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शुल्लक वादातून जवळच्या मित्रानेच मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत तरुणाचे नाव मल्लेश असे असून आरोपीचे नाव भुऱ्या असे आहे. सदर घटना काल रात्रीच्या सुमारास घडली असून पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. तसेच पुढील तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील आरोपी महिलेला मारहाण केल्याप्रकरणी 13 महिने कारागृहात बंदिस्त होता. तो नुकताच बाहेर आला होता. काल म्हणजेच बुधवारी रात्री ११च्या सुमारास वणी शहरातील बाकडे पेट्रोलपंपाजवळ शुल्लक कारणातून मल्लेश आणि त्याचा मित्र भुऱ्या या दोघांमध्ये टोकाचा वाद झाला.
या वादातून भूऱ्याने धारदार शस्त्राने हल्ला करून मल्लेश याची हत्या केली. पेट्रोलपंपाजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मल्लेशला पाहून नागरिकांना धक्का बसला. त्यांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.