Dhule Crime : लग्नसोहळ्यात रक्तरंजित थरार! ८ जणांवर चाकूने सपासप वार, तिघांचा जागीच मृत्यू

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यात साखरपुड्यादरम्यान किरकोळ वादातून झालेल्या चाकूहल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला असून पाचजण गंभीर जखमी आहेत. या घटनेने पिंपळनेर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Dhule Crime : लग्नसोहळ्यात रक्तरंजित थरार! ८ जणांवर चाकूने सपासप वार, तिघांचा जागीच मृत्यू
Dhule Wedding Fatal TragedySaam Tv
Published On
Summary
  • धुळ्यात साखरपुड्यात किरकोळ वादातून चाकूहल्ला

  • तिघांचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी

  • व्हॉट्सअ‍ॅप संदेशांमुळे तणाव वाढल्याची माहिती

  • घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण, पोलिस तपास सुरू

भूषण अहिरे, धुळे

Dhule Wedding Fatal Tragedy धुळ्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका लग्नसमारंभात शुल्लक वादातून आठ जणांवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना धुळे येथील पिंपळनेर येथे नीलकंठ नगरात गोसावी समाजाच्या लग्नकार्यादरम्यान घडली आहे. साखरपुड्याची तयारी सुरू असताना साक्री व सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनचा वाद होताच. तसेच साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह संदेश व व्हिडिओ शेअर केल्याने तणाव वाढला होता. त्या वादातूनच लग्नस्थळी अचानक संपलेल्या काही जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला.

Dhule Crime : लग्नसोहळ्यात रक्तरंजित थरार! ८ जणांवर चाकूने सपासप वार, तिघांचा जागीच मृत्यू
Accident : ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी १८ दिवसापूर्वी पुण्यातून निघाले, पण गुजरातमध्ये काळाने घात केला; ३ जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू

या हल्ल्यात ८ जण गंहीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला असून ५ जणांवर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी कानागिरी मुलागिरी गोसावी, यशवंत गोपाल गोसावी, अनिल गिरी हटुगिरी गोसावी, सोनुगिरी गोसावी, विजुगिरी हटुगिरी गोसावी, कमलेश गिरी शंभू गिरी गोसावी आणि हर्षु शंभू गोसावी यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. लग्नसोहळ्यातील या रक्तरंजित घटनेमुळे पिंपळनेर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com