

IAS अभिषेक शर्मा यांचा प्रवास
दोनदा अपयश, तिसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक
चांगल्या पॅकेजची नोकरी सोडून केली परीक्षेची तयारी
स्पर्धा परीक्षा पास करण्यासाठी फक्त अभ्यास नव्हे तर शिस्त, वेळ आणि आत्मविश्वास गरजेचा असतो. तुम्ही जर अभ्यासाचे आणि वेळेचे व्यवस्थित नियोजन केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळते. यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप खंबीर असायला हवे. यूपीएससी परीक्षेत तुमच्या अभ्यासासोबतच इतर गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात. याच गोष्टी आयएएस अभिषेक शर्मा यांनी आकलन केल्या. त्याचेच फळ त्यांना मिळाले. त्यांनी यूपीएससी परीक्षा पास करुन आयएएस पदाला गवसणी घातली आहे.
अभिषेक शर्मा यांनी सुरुवातीचे शिक्षण नवोदय विद्यालयातून केले. त्यांचे वडील नवोदय विद्यालयात इंग्रजीचे शिक्षक होते. यानंतर त्यांनी भोपाळधील मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून २०२२ मध्ये इंजिनियरिंग पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी मल्टी नॅशनल कंपनीत नोकरी केली. त्यांना चांगले पॅकेजदेखील होते परंतु त्यांचे स्वप्न वेगळेच होते. त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेची तयारी केली.
यूपीएससी परीक्षेत अभिषेक सुरुवातीला दोनदा नापास झाले. परंतु तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न केले. शेवटी तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले. त्यांनी २०२४ मध्ये ऑल इंडिया रँक ३८ प्राप्त केली. त्यांनी शेवटी यूपीएससी परीक्षा पास करुन आपले स्वप्न पूर्ण केले.
अभिषेक शर्मा यांनी दिवसरात्र अभ्यास केला. त्यांनी खूप मेहनतीने स्पर्धा परीक्षा पास केली. त्यांच्या या यशामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं समजून प्रयत्न करा. यश नक्कीच तुम्हाला मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.