Success Story: आधी BPSC पास मग UPSC केली क्रॅक; आर्मी अधिकाऱ्याची लेक झाली IPS; तनु सिंह यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of IPS Tanoo Singh: आयपीएस तनु सिंह यांनी एक नव्हे तर दोन स्पर्धा परीक्षा पास केल्या आहेत. त्यांनी आधी बिहार लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली त्यानंतर यूपीएससी परीक्षा पास केली.
Success Story
Success StorySaam tv
Published On
Summary

IPS तनु सिंह यांचा प्रेरणादायी प्रवास

आधी BPSC क्रॅक नंतर UPSC दिली

आर्मी ऑफिसरची लेक झाली IPS

स्पर्धा परीक्षा पास करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. तुम्ही चांगले प्रयत्न केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळते. परीक्षा कितीही अवघड असली तरी इच्छाशक्ती आणि प्रयत्नांच्या जोरावर तुम्ही यश मिळवू शकतात. असंच काहीसं आयपीएस तनु सिंह यांनी केलं. त्यांनी दोन स्पर्धा परीक्षा पास केल्या आहेत.

Success Story
Success Story: सलग दोनदा UPSC क्रॅक; इंटरव्ह्यूमध्ये विचारला होता 3 इडियट्सचा प्रश्न; IPS मोहन शक्ती अवस्थी आहेत तरी कोण?

तनु सिंह यांनी सुरुवातीला बिहार लोकसेवा आयोग (BPSC) परीक्षा पास केली. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. यूपीएससी परीक्षा पास करुन त्या आयपीएस पदावर कार्यरत आहेत. आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे.

तनु सिंह यांचे शिक्षण

तनु या मूळच्या उत्तर प्रदेशमधील गोरखपुरमधील गौरीबाजार गावातील रहिवासी आहेत. त्यांचे वडील रणजित सिंह हे इंडियन आर्मीत कार्यरत होते. त्यांची आई गृहिणी होती. त्यांनी आपले शिक्षण आर्मी पब्लिक स्कूलमधून केले. त्यानंतर बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधून सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केले.

ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तनु या पटना येथे शिफ्ट झाल्या. त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. त्यांनी बीपीएससी परीक्षा पास केली. परंतु त्यांचे लक्ष्य होते यूपीएससी. त्यामुळे त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरु केली.

Success Story
Success Story: ठाण्याचा लेक झाला IPS; २२व्या वर्षी क्रॅक केली UPSC; अभिजित पाटील यांचा प्रवास

चौथ्या प्रयत्नात पास केली यूपीएससी

यूपीएससीच्या सलग तीन प्रयत्नांमध्ये त्यांना अपयश मिळाले. परंतु जॉब करताना त्यांनी परीक्षेची तयारी केली. त्यांनी चौथ्या प्रयत्नात शेवटी यश मिळवले. त्यांनी ५४० रँक प्राप्त केली. त्यानंतर त्या आयपीएस अधिकारी झाल्या. तनु यांनी आपल्या वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला. त्यांच्या वडिलांनी त्यांना खूप सपोर्ट केला.

Success Story
Success Story: वडील मजुरी करायचे, आई भाजी विकायची, सोलापूरचा लेक IPS झाला, २० लाखांची नोकरी सोडून UPSC केली क्रॅक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com